एक्स्प्लोर
शाहरुख खानचे असे काही चित्रपट जे कधी रिलीजच झाले नाही, हॉलिवुडच्या दमदार चित्रपटाचाही समावेश!
Shah Rukh Khan : शाहरुख खानला आज जगभरातील लोक ओळखतात. मात्र त्याचे काही असे चित्रपट आहे, जे कधी आले पण प्रदर्शित मात्र झालेच नाही.

shah rukhk khan (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

शाहरुख खान हा असा अभिनेता आहे, ज्याला आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले तर काही चित्रपट कमाईच्या बाबतीत फारशी कमाल करू शकले नाहीत. विशेष म्हणजे त्याचे काही चित्रपट तर रिलिजही होऊ शकले नाहीत. हे चित्रपट कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...
2/7

शाहरुख खानने 2011 साली हॉलिवुडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे त्याचा एक्स्ट्रिम सिटी हा चित्रपट येणारही होता. या चित्रपटात टायटॅनिक चित्रपटातील लियोनार्डो डीक्रप्रियो हा दिग्गज अभिनेता होता. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
3/7

त्याच्या रश्क या चित्रपटाची कथादेखील अशीच आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण 2001 साली पूर्ण झाले होते. त्याच्यासोबत जुही चावला, अमिताभ बच्चन आदी दिग्गज कलकार होते. मात्र काही कारणास्तव हा चित्रपटही प्रदर्शित होऊ शकला नाही.
4/7

शाहरुख खानचा अहमक हा चित्रपटही असाच आहे. हा चित्रपट 1991 साली येणार होता. मणीकौल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. मात्र हा चित्रपट नंतर 2015 साली फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता. मात्र तो अधिकृतपणे प्रदर्शितच झाला नाही.
5/7

दिग्दर्शक सुभाष घई यांच्या परदेस चित्रपटात शाहरुख खानने नायकाची भूमिका केली होती. याआधी सुभाष घई शाहरुखसोबत शिखर हा चित्रपट करणार होते. मात्र या चित्रपटात काही बदल करण्याचा सल्ला शाहरुखने सुभाष घईने दिला होता.
6/7

मात्र सुभाष घईने नकार दिल्यामुळे शाहरुखने शिखर हा चित्रपट सोडला. त्यानंतर या चिपटाचे नाव ताल असे ठेवून सुभाष घईने अक्षय खन्ना, अनिल कपूर यांना सोबत घेत हा चित्रपट केला. विशेष म्हणजे हा चित्रपट सुपरहिट ठरला.
7/7

शाहरुख खानचा किसी से दिल लगाके देखो हा चित्रपट येणार होता. त्याचे शूटिंगही पूर्ण झाले होते. मात्र काही कारणामुळे हा चित्रपट नंतर प्रदर्शित होऊ शकला नाही.
Published at : 01 Feb 2025 07:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
