एक्स्प्लोर
Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री दादा भूसेंच्या हस्ते ध्वजारोहण, पाहा Photos
Nashik News : आज 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर पार पडला. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

Republic Day 2024 Nashik News
1/10

सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी केले. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)
2/10

पोलीस दल, होमगार्ड, गृहरक्षक, शहर वाहतुक शाखा, अग्निशमन दल, भोसला मिलटरी पथक, उर्दु बडी दर्गा, पोलीस बॅन्ड पथक, डॉग युनिट आदी पथकांनी संचलन केले. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)
3/10

यावेळी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार, राष्ट्रपती पदक, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, विशेष सेवा पदकाचे वितरण करण्यात आले. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)
4/10

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)
5/10

नाशिक जिल्ह्याचा समावेश क्वालिटी सिटी अंतर्गत करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व शिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मॉडेल स्कुल योजना तसेच JEE व NEET प्रवेशासाठी सुपर ५० हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे यावेळी दादा भुसे म्हणाले. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)
6/10

उमेद अभियान अंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पाच हजार 167 महिला स्वयंसहाय्यता गटांना 145 कोटी 46 लाखांचे बँकेमार्फत अर्थसहाय्य देण्यात आले. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत 80 दुकानांच्या निर्मिती करीता 3.38 कोटी अर्थसहाय्य देण्यात आले आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)
7/10

पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)
8/10

जिल्ह्यात 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 15 तालुक्यातील पाच हजार 500 दिव्यांगाची तपासणी करण्यात आली असून त्यांना मोफत सहाय्यक साधने वाटपाचे नियोजन करण्यात येत आहे, असेही दादा भुसे म्हणाले. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)
9/10

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)
10/10

विविध शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)
Published at : 26 Jan 2024 02:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
