Amol Mitkari: नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवलं, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप, म्हणाले..
कोरटकर जर दुबई पळून गेला असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश असल्याचं मिटकरीं म्हणालेत. दरम्यान, कोरटकर चंद्रपुरात येऊन पोलीस अधिकाऱ्यांना कसा भेटतो? असा सवालही त्यांनी केलाय. (Nagpur Police)

नागपूर: इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा गदारोळ सुरु आहे. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आल्याने सध्या मोठी खळबळ उडालीय.याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी दुबईतील प्रशांत कोरटकरचा एक फोटो समोर आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे आरोप नागपूर पोलीसांवर केले जातायत. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी नागपूर पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलंय. नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) लपविल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केलाय. कोरटकर जर दुबई पळून गेला असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश असल्याचं मिटकरीं म्हणालेत. दरम्यान, कोरटकर चंद्रपुरात येऊन पोलीस अधिकाऱ्यांना कसा भेटतो? असा सवालही त्यांनी केलाय. (Nagpur Police)
गेल्या 15 दिवसांपासून पोलीस प्रशांत कोरटकर तपास यंत्रणांच्या रडावर आहे. मात्र, कोलकत्यासारख्या प्रमुख विमानतळावरून तो व्हिसा वापरून दुबईला जातो हे अनेकांच्या पचनी पडत नाहीय. त्यामुळे प्रशांत कोरटकरला देशाबाहेर सुरक्षित पळून जाण्यासाठी नागपूर पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची मदत होती का? असा सवाल केला जातोय.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
नागपूरमध्ये हिंसाचार घडल्यानंतर प्रशांत कोरटकर चंद्रपूरात असल्याचं कळतं. चंद्रपूरात तो एका पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याचं कळतं. कोरटकरला नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यानंतर त्याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. भाजपचे स्थानिक आमदार परिणय फुके यांनी माध्यमांना सांगितलं होतं की दोन दिवसात कोरटकरला अटक होईल. आता असं कळतंय की तो दुबईला पळून गेला. जो फोटो व्हायरल होतोय तो दुबईतलाच दिसतोय पण तो आताचा असेल असं वाटत नाही. नागपूर विमानतळावरून जाणं किंवा कोलकाता विमातळावरून असे जाणे सोपे नाही. गृहमंत्री त्यावर लक्ष ठेवून आहे. मात्र, नागपूर पोलिसांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एवढी मोठी दंगल घडवली ज्या लोकांनी ही दंगल घडवली त्यांना ड्रेस करायला इतका वेळ का लागला? तुम्हाला दंगल होताना गाड्यांवर दगडफेक होणार तलवारी चालणार हे माहित असताना हे का लपवले गेले? या दंगली चा फायदा घेऊन कोरटकर याने दंगल भडकवली नसेल कशावरून? असा सवाल ही अमोल मिटकरी यांनी केला. या दंगलीचा फायदा घेऊन कोरटकर मोकाट सुटला का? जोपर्यंत नागपूर पोलीस कोरटकरच्या मुस्क्या आवळून त्याला जेलमध्ये टाकणार नाहीत तोपर्यंत हे प्रश्नचिन्ह कायम राहणार. दुर्दैवाने पोलीस प्रशासनच हलगर्जीपणा करत असेल तर महायुतीचे सरकार जितक्या चांगल्या प्रकारे जनतेच्या हिताचे काम करते आहे, त्यावेळी अशाप्रकारे एखादा आरोपी सापडत नसेल तर कोरटकरला नागपूर पोलिसांचं अभय आहे का? असा प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला वाव मिळतो आहे. नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवला आहे, असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला.
प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांची पथकं
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची दोन पथक नागपूरमध्ये ठाण मांडून आहेत.त्यातील एक पथक चंद्रपूरमध्ये काल दाखल झाले. काल दिवसभर या पथकाने चंद्रपूरमध्ये विविध ठिकाणी तपास केला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकर हा चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये राहत होता. मात्र 19 च्या रात्री हॉटेलमधून बाहेर पडला, मात्र तो नागपूरच्या दिशेने आला नाही.कोल्हापूर पोलीस याच हॉटेलच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याच्यासोबत कोणी आहे का? याचा शोध घेत आहेत. कोल्हापुरातून नागपूरला गेलेल्या पोलिसांच्या पथकाला स्थानिक यंत्रणेची मदत होत नसल्याची खंत कोल्हापूर पोलीस सांगत आहेत.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

