एक्स्प्लोर

Nashik Politics : महायुतीत श्रेयवादाची लढाई; अजितदादांनी भूमिपूजन केलेल्या कामाचं एकनाथभाईंकडून पुन्हा भूमिपूजन? नेमकं काय घडलं?

Nashik Politics : देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगरपरिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.

Nashik Politics : नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात (Deolali Vidhan Sabha Constituency) उमेदवारीवरून महायुतीत (Mahayuti) झालेला संघर्ष निवडणुकीनंतरही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगरपरिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेचा काल रविवारी (दि. 17) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. यानंतर देवळालीच्या अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांचं नाव न घेता उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र हे पाणीपुरवठा योजनेचे काम भगूर नगर परिषदेचेच असून येत्या आठ दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती विजय करंजकर यांनी दिली आहे. यामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा वाद पुन्हा उफाळून येणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर देखील देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेत विकासकामांवरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.  भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयावरून राष्ट्रवादी दोन्ही पक्षातील नेते आमनेसामने आले आहेत.  काल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचे शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केला होता.  मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. भगूरमध्ये तुम्ही काम करू नका असं मला सांगितलं जातं, असे सरोज अहिरे यांनी म्हटले होते. यानंतर अजित पवारांनी देखील सरोज अहिरे यांची पाठराखण केली होती.  

शिवसेना नेत्यांकडूनही सरोज अहिरेंवर पलटवार

भगूर नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाली आहे.  आमच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या योजनेचे श्रेय विद्यमान आमदार सरोज अहिरे घेत आहेत, असे प्रयुत्तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय करंजकर यांनी सरोज अहिरे यांनी दिले आहे. येत्या आठ दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केलं जाणार असल्याचे देखील विजय करंजकर यांनी म्हटले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Saroj Ahire : शिंदेंच्या शिवसेना नेत्यांकडून त्रास होत राष्ट्रवादीच्या आमदाराची तक्रार, अजितदादांसमोर खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, तेव्हा मीही राजीनामा दिला होता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित- यशस्वी सलामीला येणार? कॅप्टन केएल राहुल 'या' स्थानावर फलंदाजीला येणार, संभाव्य प्लेईंग XI
केएल राहुलचं ठरलं, पहिल्या वनडेत या स्थानावर फलंदाजी करणार, रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? 
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget