Shiv Sena UBT : कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा तळकोकणातला शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला; चर्चांना उधाण
Shiv Sena UBT : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरु असून ठाकरे गटातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

Shiv Sena UBT : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) ऑपरेशन टायगर सुरु असून ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकणातील ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाकरेंना रामराम केलाय. तर माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी देखील शिंदे गटाची वाट निवडली आहे. माजी आमदार राजन साळवी यांच्यासह कोकणातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीला दाखल झाले आहेत.
कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक मातोश्रीवर (Matoshree) उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघात (Kudal Assembly Constituency) झालेल्या पराभवानंतर वैभव नाईक पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झालेत. वैभव नाईक यांच्या मागे मागील काही दिवसांपासून एसीबी (ACB) चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. तर कोकणात अनेक पदाधिकारी ठाकरे गटाची साथ सोडत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वैभव नाईक दाखल झाले आहेत. आता उद्धव ठाकरे आणि वैभव नाईक यांच्यात नेमकी काय चर्चा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला अनेक पदाधिकारी सोडचिठ्ठी देत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती. अर्थशंकल्पीय अधिवेशन सुरु असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरु होती. त्या सोबतच ऑपरेशन टायगरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे हे 20 फेब्रुवारीला खासदारांची आणि 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक घेणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

