एक्स्प्लोर
Nashik Nandgaon Fog : नांदगाववर दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल; पाहा Photos
Nandgaon Fog : जिल्ह्यातील नांदगाव परिसरावर दाट धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

Nashik Winter Season Nandgaon Fog
1/8

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या नांदगाव परिसरात ढगाळ वातावरण आहे. आज सकाळी नांदगाव शहर व परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आले.
2/8

सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सूर्याचे दर्शन झाले नाही.
3/8

या धुक्यामुळे कांदा व इतर शेती पिकांवरही रोगांचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
4/8

धुके एवढे दाट होते की काही फुट अंतरापर्यंत काहीच दिसत नसल्याने वाहने दिवे लावून चालवावी लागत होते.
5/8

मॉर्निंग वाकसाठी आलेल्या नागरिकांना मात्र या वातावरणाचा सुखद अनुभव घेतला.
6/8

नाशिक शहरातही पहाटेच्या वेळी धुके पडत आहेत.
7/8

सोमवारी उत्तर महाराष्ट्रात सोमवारी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
8/8

धुक्यांमुळे नांदगाव परिसरातील नागरिक थंडीचे अनुभूती घेताना दिसून येत आहे.
Published at : 08 Jan 2024 03:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
