कोल्हापुरकरांनो जपून! आजही अवकाळी, सोलापूरसह धाराशिव व सांगलीतही यलो अलर्ट, उर्वरित राज्यात काय अंदाज?
IMD Forecast:दरम्यान, लातूर, नांदेडमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही अवकाळी पावसाची शक्यता आहे

IMD Forecast: राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान, सोलापूर, कोल्हापूर सातारा, सांगलीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान, आजही कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, लातूर, नांदेडमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही अवकाळी पावसाची शक्यता आहे. (Unseasonal Rain) तर पावसाची शक्यता नसलेल्या उर्वरित बहुतांश भागात तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय.

पावसाची शक्यता वगळता उर्वरित महाराष्ट्रात तापमानात काहीशी वाढ झाली आहे. अकोत्यात तापमानाने उच्चांक गाठला होता. कमाल तापमान 41.4 अंश सेल्सियस नोंदवले गेले. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उष्णतेने हैराण केले होते. संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा जवळपास 38-42 अंश असाच आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार आणि जळगाव 40 अंशांच्या पुढे गेले. मध्य महाराष्ट्रात पुणे 38.2 अंशांवर होतं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 39.2 अंशांची नोंद झाली. कोकणात सामान्यहून अधिक तापमानाची नोंद झाली.
Nowcast warning at 1440 Hrs 26 Mar: #Thunderstorm with lightning and Light spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of #Kolhapur during next 3-4 hours. Take precautions while moving out.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 26, 2025
-IMD MUMBAI pic.twitter.com/OxtNdIWYAz
हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात हळूहळू येत्या दोन दिवसात कमाल तापमान 1-2 अंशांनी वाढणार आहे. कमाल तापमान बहुतांश भागात 39-41 अंशांदरम्यान राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.सध्या वाढलेलं किमान तापमान येत्या दोन दिवसात काहीसं कमी होणार आहे. आज (26) मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा आहे.विदर्भात तापमानाचा पा चंद्रपूर जिल्ह्यात 40.4 अंश सेल्सियसची नोंद झाली. अमरावतीही 40.2 अंशांवर होते. दरम्यान, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात 38-40 अंशांपर्यंत पारा पोहोचला होता.
अवकाळीचा तडाखा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ उतार दिसत आहेत. उष्णतेच्या लाटेनंतर हवामान विभागाने सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा अलर्ट दिला होता. मागील दोन दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून टरबूज बागा मातीमोल झाले आहेत. सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अवकाळी पावसाने काही भागांमध्ये हजेरी लावली. सांगलीत मुसळधार पावसाने वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. या तिन्हीही जिल्ह्यात बागायतदारांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा:
























