एक्स्प्लोर
Rain : दिलासादायक! मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
हवामान विभागानं (imd) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. मुंबईत (Mumbai) देखील पावसानं हजेरी लावली आहे.

Maharashtra Rain
1/9

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
2/9

हवामान विभागानं (imd) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाला सुरुवात
3/9

मुंबईसह परिसरात पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
4/9

राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे.
5/9

या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
6/9

गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने गडचिरोलीस परिसरात हजेरी लावली. त्यामुळं उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
7/9

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र, पाऊस सतत हुलकावणी देत असल्यानं शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.
8/9

खरीप पूर्व मशागतीची कामं पूर्ण झाली असून, पेरणीसाठी शेतकरी सज्ज आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
9/9

मोठ्या प्रतीक्षेनंतर चिपळूणमध्ये मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यानं शेतकरी सुखावला आहे
Published at : 24 Jun 2023 09:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion