एक्स्प्लोर
Raj Thackeray on Santosh Deshmukh Case: राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो ऐकलं होतं, पण बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात; राज ठाकरेंचा वाल्मिक कराडवर निशाणा
Raj Thackeray Speech: राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बीडमधील गुन्हेगारीबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी बीडमधील राखेचे अर्थकारण, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर भाष्य केले.
Raj Thackeray on Beed Crime
1/10

बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारण्यात आले. जे काही घडलं वीज कंपनीच्या राखेवरुन. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात, असे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात म्हटले
2/10

संतोष देशमुख यांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी खंडणी आणि पैशाच्या विषयातून मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते ?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
3/10

बीडमध्ये वंजारा-मराठी वाद हा जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
4/10

राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच संतोष देशमुख प्रकरण आणि वाल्मिक कराड प्रकरणावर भाष्य केले.
5/10

बीड जिल्ह्यातील परळीत औष्णिक विद्युत केंद्र आहे. या विद्युत केंद्रात राख मोठ्याप्रमाणावर निर्माण होते. या राखेवर बीड जिल्ह्यातील अर्थकारण अवलंबून आहे.
6/10

बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. विषय होता पैशांचा. देशमुखांनी विरोध केला. तिथे संतोष देशमुख नसते कोणी दुसरं असतं तर तेच केलं असतं. विषय होता, पैशांचा, खंडणीचा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
7/10

राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावरुन वाल्मिक कराड याला लक्ष्य केले. संतोष देशमुख यांना घाणेरड्या पद्धतीने मारण्यात आले. किती घाणेरड्या प्रकारे एखाद्या माणसाला मारावं. तुमच्या अंगात नसानसांत एवढी क्रुरता असेल तर मी जागा दाखवेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
8/10

बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. विषय होता पैशांचा. देशमुखांनी विरोध केला. तिथे संतोष देशमुख नसते कोणी दुसरं असतं तर तेच केलं असतं. विषय होता, पैशांचा, खंडणीचा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
9/10

या सगळ्याला आपण लेबल काय लावलं? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. त्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध, कशात गुंतून पडतोय. पण तुम्हाला गुंतवलंय जातं आहे. राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतात, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
10/10

राज्यात दिवसाला सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. लक्ष देऊ नका. रोजगाराकडे लक्ष देऊ नका. आपल्याला जातीपातीत अडकवलं. कोणी जातीचं भलं केलं नाही. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर इतकी वर्ष जास्तीत जास्त आमदार, मंत्री, मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Published at : 31 Mar 2025 07:15 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























