'स्वतःच्या आया, बहिणींचे व्हिडीओ जाऊन बघा, त्यांचंही शरीर माझ्यासारखंच...'; कास्टिंग काऊचचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचा संताप
Shruthi Narayanan Reacts On Leaked Casting Video: प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिच्या कथितरित्या लीक झालेल्या कास्टिंग काऊच व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. लीक झालेला व्हिडीओ आणखी पसरवणाऱ्यांवर तिनं संताप व्यक्त केला आहे.

Shruthi Narayanan Reacts On Leaked Casting Video: प्रसिद्ध अभिनेत्रीनं कथित कास्टिंग काऊचच्या (Casting Couch) व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) कास्टिंग काऊचचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. ज्यावरुन अभिनेत्रीला टीकेचा सामना करावा लागतोय. तसेच, तिची खिल्लीही उडवली जात आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच, आता अभिनेत्रीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री श्रुती नारायणन (Shruthi Narayanan) हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे की, हा काळ तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी खूपच कठीण आहे. तसेच, तिनं लीक झालेला व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात रागही व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या वेगानं व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी निर्वस्त्र दिसत आहे. तर, त्या मुलीचा चेहरा अभिनेत्री श्रुती नारायणनसारखाच आहे. हा व्हिडीओ 14 मिनिटांचा आहे. काहीजण म्हणतायत की, हा व्हिडीओ AI किंवा डीपफेक असू शकतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काहीजण अभिनेत्रीची खिल्ली उडवत आहेत. यावर श्रुती नारायणन संतापली आणि तिने इंस्टाग्राम स्टोरीवरील एका नोटमध्ये लोकांना लीक झालेला व्हिडीओ शेअर करू नका, असं आवाहन केलं आहे.
श्रुती नारायणन काय म्हणाली?
श्रुती नारायणन हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिलं आहे की, "हा तुमच्यासाठी फक्त एक विनोद आणि मजेदार कंटेंट आहे. पण हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी कठीण काळ आहे. विशेषतः माझ्यासाठी, हा खूप कठीण काळ आहे आणि ही परिस्थिती हाताळणं कठीण होत चाललं आहे."
![]()
"तुमच्या आया-बहिणींचे आणि गर्लफ्रेंडचे VIDEO जाऊन बघा..."
श्रुति नारायणननं पुढे लिहिलंय की, "मीसुद्धा एक मुलगी आहे आणि माझेही नातेवाईक आहेत. पण, तुम्ही सारेजण हे अत्यंत वाईट आणखी वाईट असल्याचं भासवत आहात. मी तुम्हा सर्वांना विनंती करतेय की, हे तुम्ही जंगलात लागलेल्या वणव्याप्रमाणे पसरवू नका, सर्वात आधी जाऊन स्वतःच्या आया-बहिणींचे आणि गर्लफ्रेंडचे व्हिडीओ पाहा. त्यांचंही शरीर माझ्यासारखंच आहे. त्यांचे व्हिडीओ एन्जॉय करा."
"लीक व्हिडीओ शेअर करणं, खरा किंवा डीपफेक गुन्हा..."
श्रुति नारायणननं इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलंय की, याप्रकारचे व्हिडीओ (कास्टिंग काऊच) कसा कुणाचं आयुष्य बरबाद करू शकतात. त्यांनी लिहिलंय की, "माणूस बना, लीक झालेले व्हिडीओ शेअर करणं, मग ते खरे असो किंवा डीपफेक, भारतात अपराध आहे. इथे काही कायदेशीर तरतुदी आहेत, ज्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. त्यानंतर श्रुतीनं लीक झालेला व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर काय कारवाई करता येईल याची यादी शेअर केली आहे.
दरम्यान, श्रुति नारायणन हिनं आपल्या अभिनयाची सुरुवात तमिळ टेलिव्हिजन शोमधून केलेली. तर तिनं काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिला तमिळ टेलिव्हिजन शो Siragadikka Aasai मधून प्रसिद्धी मिळाली होती.























