IPL RR vs CSK Malaika Arora: अर्जुनसोबत ब्रेकअप, आता थेट राजस्थानच्या डगआऊटमध्ये दिसली मलायका, त्याच्यासोबत डेटिंगची चर्चा!
IPL RR vs CSK Malaika Arora: राजस्थान आणि चेन्नईचा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील उपस्थित होती.

IPL RR vs CSK Malaika Arora: आयपीएल 2025 च्या (IPL 2025) हंगामात काल (30 मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 6 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्स 20 षटकांत फक्त 176 धावा करता आल्या.
Pink Prevail in a sea of Yellow 🙌#RR held their nerve to record their first win of the season by 6 runs 👍
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
Scorecard ▶️ https://t.co/V2QijpWpGO#TATAIPL | #RRvCSK | @rajasthanroyals pic.twitter.com/FeD5txyCUs
राजस्थान आणि चेन्नईचा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) देखील उपस्थित होती. मलायका राजस्थान रॉयल्सची जर्सी घालून संघ संचालक कुमार संगकाराच्या शेजारी बसलेली दिसली. मलायकाला पाहून पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे. मलायका जास्त क्रिकेटच्या मैदानात दिसत नाही, मात्र अचानाक राजस्थानची जर्सी घालून सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावल्याने सोशल मीडियावर मलायकाबाबत विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
Malaika Arora with Kumar Sangakkara. pic.twitter.com/6ZGwGXqOFu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 30, 2025
Malaika Arora in the rr dugout
— Bhargav (@Bhargav76605307) March 30, 2025
Watching csk vs rr❤️#CSKvsRR pic.twitter.com/im9ZweL9tI
सोशल मीडियावर कोण काय म्हणाले?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचे ब्रेकअप-
मलायका अरोरा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. अर्जुन कपूरच्या आधी मलायकाचे लग्न अरबाज खानशी झाले होते, परंतु 17 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.
सामना कसा राहिला?
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली आणि 0 धावांवर रचिन रवींद्र आऊट झाला. रचिनला जोफ्रा आर्चरने आऊट केले. यानंतर, राहुल त्रिपाठी आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. पण राहुल त्रिपाठी सेट झाल्यानंतर आपली विकेट गमावली. राहुलला श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने धावबाद केले. त्यानंतर हसरंगाने 'इम्पॅक्ट प्लेयर' शिवम दुबे (18) आणि विजय शंकर (9) यांना बाद केले. विजय शंकर बाद झाल्यानंतर काही वेळातच कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, ऋतुराज एका महत्त्वाच्या क्षणी आऊट झाला. ऋतुराजला वानिंदू हसरंगाने आऊट केले. त्याने 44 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 63 धावा केल्या. पण चेन्नई 20 षटकांत केवळ 176 धावाच करू शकली आणि सामना 6 धावांनी गमावला.

























