एक्स्प्लोर
Beed Stone: भिकाजी अंभोरेंच्या पत्र्यावर धाडकन 2 दगडं पडले अन् कुतूहल चाळवलं, शास्त्रज्ञांनाही गुढ उकलले, खळवट लिमगावात काय घडले?
आपल्या घरावरील पत्राचा नेमका आवाज कशाचा आला यासाठी शोधाशोध केली असता घरात गेल्यावर पत्र्याला छिद्र पडून खाली दगड पडल्याचे दिसलं.
Beed Stone
1/8

बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगावात भिकाजी अंभोरे यांच्या पत्रावर धाडकन दोन दगड पडले .
2/8

त्यातला एक दगड पत्राला छिद्र पाडून आत येऊन पडला .तर दुसरा दगड शेतकऱ्याच्या घरा शेजारच्या गायरान जागेत पडला .हा दगड पडताना खेळणाऱ्या मुलांनी पहिल्याचंही त्यांनी सांगितले .
3/8

हे कळता क्षणी तहसील प्रशासनातल्या अधिकारी गावात येऊन दगडांचा पंचनामा करून गेले .मग अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासाकांनीही गावाला भेट दिली .
4/8

अधिकाऱ्यांना आणि शास्त्रज्ञांना दगड कसा पडला हे सांगताना वडवणी गावातील मुलं प्रचंड उत्साहात मोठा आवाज झाल्याचं सांगत होते .
5/8

या अभ्यासाकांनी दगडाची पाहणी केल्यानंतर 80 सेंटीमीटर आकाराचे हे दगड उल्कापिंड असल्याचं सांगितलं .
6/8

हा सगळा आशनीपाताचा प्रकार असावा असं जाणवत असल्याचं खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी 'एबीपी माझा 'ला सांगितलं .
7/8

या उल्कापिंडाला म्हणजे या दोन्ही दगडांना आता जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ ताब्यात घेणार आहेत .
8/8

त्यांच्याकडून पुन्हा एकदा या उल्कापिंडींचे विश्लेषण करण्यात येईल तेव्हा नेमकं चित्र स्पष्ट होईल असेही सांगण्यात आलंय .
Published at : 06 Mar 2025 02:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























