एक्स्प्लोर
काय सांगता! बीडच्या रस्त्यावर अवतरले अंतराळवीर; पाहा फोटो
चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर देशभरात आनंद साजरा करण्यात आला. मात्र, तिकडे बीडमध्ये अंतराळवीराचा पोशाख घालून सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी खड्डे पडलेल्या रस्त्यावर आंदोलन केले.

Astronauts landed on Beed Roads
1/7

बीड शहरातील नगर रोड आणि जालना रोड आणि मोंढा नाका ते अमरधाम स्मशानभुमी परिसरात अचानक अंतराळवीर दाखल झाले.
2/7

यावेळी अंतराळवीर आले अंतराळवीर आले, अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली. यानंतर लोकांनी त्याठिकाणी गर्दी केल्यानंतर कळले की ते रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी डॉ. गणेश ढवळे यांचे लक्षवेधी आंदोलन होते.
3/7

याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शेख युनुस, रामनाथ खोड यांनी अंतराळवीरांचा प्रतिकात्मक वेश परिधान करुन बीड शहरातील रस्त्यांवरून प्रवास करत नेत्यांच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला.
4/7

बीड शहरातील नगररोड आणि जालनारोड तसेच मोंढा नाका, जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.
5/7

रस्त्यावरील दुरावस्थेमुळे बीडकरांसह जिल्ह्याच्या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनचालकांची अनेक वर्षांपासून तारेवरची कसरत सुरू आहे. मणक्यांच्या व्याधींनी त्रस्त असून मोठ्या प्रमाणावर अपघात घडलेले आहेत.
6/7

बीडमध्ये नेत्यांची आणि पुढाऱ्यांची कमतरता नसताना सर्वसामान्यांच्या हाल अपेष्ठांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य हे चंद्रग्रहावरील खड्डयांप्रमाणे अधोरेखित होत आहे.
7/7

चंद्रावर जसे खड्डे आहेत तसेच खड्डे बीडमधल्या रस्त्यावर पडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत हे आंदोलन करण्यात आले आहेत.
Published at : 30 Aug 2023 11:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion