एक्स्प्लोर
अन्नत्याग आंदोलनात बच्चू कडूंची तब्येत बिघडली, बीपी वाढला, शुगर डाऊन झाली, पहा Photos
अन्नत्याग आंदोलनात बच्चू कडूंची तब्येत बिघडली, बीपी वाढला, शुगर डाऊन झाल्याचं समजतंय.
Bacchu Kadu
1/8

कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे.
2/8

रायगडच्या पायथ्याशी रखरखत्या उनामुळे त्यांना त्रास झाला असून त्यांचा बीपी वाढलेला असून शुगर लेवल खूप कमी झाली असल्याची माहिती मिळत आहे
3/8

भर उन्हात अन्नत्याग सुरू असल्यामुळे अधिकच त्रास होत असल्याने बच्चू कडू यांना हा त्रास झाल्याचे सांगण्यात आले आहे.
4/8

दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. प्रहार नेते बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
5/8

लाडकी बहीण नाममात्र असून, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, दिव्यांग, कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता केवळ अनुदान कपातीचे धोरण आखले जात आहे. असा आरोपही त्यांनी या आंदोलनात केला होता.
6/8

रायगडमध्ये 21मार्चला हे रक्तदान शिबिर आणि अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले होते.
7/8

मात्र, उन्हामुळे भर उन्हात अन्नत्याग सुरू असल्यामुळे अधिकच त्रास होत असल्याने बच्चू कडू यांना हा त्रास झाल्याची माहिती मिळत आहे.
8/8

अन्नत्याग आंदोलनात प्रहार पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी होते.
Published at : 22 Mar 2025 02:46 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















