एक्स्प्लोर
Advantages and disadvantages of hair dryers : तुम्हीही हिवाळ्यात हेअर ड्रायर वापरताय का? मग त्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या.
Advantages and disadvantages of hair dryers : तुम्हीही हिवाळ्यात हेअर ड्रायर वापरताय का? मग त्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या.

Advantages and disadvantages of hair dryers
1/10

हिवाळ्यात हेअर ड्रायरचा वापर जास्त होतो. हे केस त्वरित कोरडे करून तुम्हाला थंडीपासून आराम देते आणि स्टाईलिश दिसण्यासाठी देखील हा खूप सोयीस्कर उपाय आहे. (Photo Credit : Unsplash)
2/10

जेव्हाही तुम्हाला बाहेर जावं लागतं, तेव्हा तुम्ही अनेकदा तुमचे केस धुण्याची, ताबडतोब कोरडे करण्याची आणि स्टाईल करण्याची घाई करत असतात. पण, या घाईत तुमच्याकडू हेअर ड्रायरचा गैरवापर होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या केसांना हानी पोहोचू शकते.(Photo Credit : Unsplash)
3/10

खरं तर, जेव्हा तुम्ही घाईघाईने केस वाळवतात तेव्हा हेअर ड्रायरमधून बाहेर पडणारी गरम हवा तुमच्या केसांचा नैसर्गिक ओलावा नष्ट करते. त्यामुळे टाळू खराब होऊ लागते आणि केस कोरडे होऊन खराब होतात. काय आहेत त्याचे तोटे जाणून घ्या. (Photo Credit : Unsplash)
4/10

जर तुम्ही हेअर ड्रायरचा योग्य वापर केला नाही, तर हेअर ड्रायरमुळे तुमच्या केसांना खूप नुकसान होऊ शकते. जेव्हा तुम्ही हेअर ड्रायर वापरता तेव्हा गरम हवा केसांच्या पृष्ठभागावरील सर्व नैसर्गिक ओलावा शोषून घेते. (Photo Credit : Unsplash)
5/10

त्यामुळे केस खूप कोरडे आणि ठिसूळ होतात. तसेच यामुळे केसांची प्रथिने कमकुवत होतात आणि ते सहजपणे तुटू लागतात.(Photo Credit : Unsplash)
6/10

हिवाळ्यात थंडीचा परिणाम त्वचेवर लवकर होतो. त्यामुळे तुम्ही जर हेअर ड्रायरने केस जास्त गरम केले तर त्याचा स्कॅल्पवर वाईट परिणाम होतो.(Photo Credit : Unsplash)
7/10

त्यामुळे हिवाळ्यात हेअर ड्रायर नेहमी कमी हिट किंवा मध्यम हिटवर वापरावे. यासोबतच हेअर स्प्रे किंवा सीरमचाही वापर करा जेणेकरून केसांचा नैसर्गिक ओलावा कायम राहील. असे केल्यास तुम्हाला कोणत्याही हानी शिवाय हेअर ड्रायरचा फायदा होऊ शकतो.(Photo Credit : Unsplash)
8/10

हेअर ड्रायरचा जास्त वापर मेंदूसाठी धोकादायक ठरू शकतो. तसेच हेअर ड्रायरमधून गरम हवा बाहेर पडते ज्यामुळे तुमचा टाळू आणि केस जास्त प्रमाणात कोरडे होऊ शकता.(Photo Credit : Unsplash)
9/10

जेव्हा ही गरम हवा तुमच्या डोक्यात आणि मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा शरीरातील तापमान वाढते. त्यामुळे मेंदूच्या पेशी आणि ऊतींचे नुकसान होऊ शकते. (Photo Credit : Unsplash)
10/10

याशिवाय डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातून पाण्याची कमतरता देखील सुरू होते जी मेंदूसाठी हानिकारक ठरू शकते. (Photo Credit : Unsplash)
Published at : 09 Dec 2023 05:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
