एक्स्प्लोर
Radhika Merchant : गुलाबी बांधणी लेहंगा, त्यावर सोन्याच्या तारेचे नक्षीकाम, नवरीबाई राधिका मर्चंटच्या लुकची चर्चा!
सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची देशभरात चर्चा होत आहे. या लग्नाआधी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे तसेच विधींचे आयोजन करण्यात आले आहे.

RADHIKA MERCHANT (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
1/8

अब्जाधीश मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह येत्या 12 जुलै रोजी होणार आहे.
2/8

त्यांच्या विवाहाची सध्या देशभरात चर्चा असून कित्येक दिवसांपासून या विवाहसोहळ्याची तयारी चालू आहे.
3/8

या विवाह सोहळ्यापूर्वी वेगवेगळ्या विधी आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूड, क्रिकेट तसेच अन्य क्षेत्रातील दिग्गज उपस्थित आहेत.
4/8

दरम्यान, या सोहळ्यादरम्यान अंबानी कुटुंबाची होणारी सुनबाई म्हणजेच राधिका मर्चंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
5/8

अनंत आणि राधिका यांच्या लग्नविधीसाठी राधिकाने आकर्षक असे कपडे परिधान केले आहेत. राधिकाचे याच कडप्यांतील काही फोटो समोर आले आहेत.
6/8

यातील एका फोटोमध्ये राधिका गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. तिच्या या लेहंग्याचे नाव बंधणी लेहंगा आहे.
7/8

गुलाबी रंगाच्या या लेहंग्यावर सुंदर असे नक्षीकाम केलेले असून त्यावर दुर्गा मातेचे श्लोक आहेत. हे श्लोक काढण्यासाठी सोन्याची तार वापरण्यात आलेली आहे.
8/8

हा लेहंगा तयार करण्यासाठी 35 मीटरचे बंधेज (एका प्रकारचे रेशमी वस्त्र) वापरण्यात आले आहे.
Published at : 06 Jul 2024 02:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
