Rohit Pawar on Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंनी मांडलेल्या हक्कभंगावर रोहित पवारांचं निवेदन
Rohit Pawar on Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंनी मांडलेल्या हक्कभंगावर रोहित पवारांचं निवेदन
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
ही बातमी पण वाचा
Devendra Fadnavis : मोठी बातमी : जयकुमार गोरेंना अडकवण्यासाठी शरद पवारांच्या नेत्यांचा हात, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
Devendra Fadnavis : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. 2016 चे हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप महिलेने केला होता. यामुळे जयकुमार गोरे हे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी काही दिवसांपासून अटक केली. आता या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केलाय.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली जी घटना आहे, आपण राजकारण करतो, पण कोणाला जीवनातून उठवायचं अशा हेतूने राजकारण योग्य करणे योग्य नाही. ती केस 2016 मध्ये रजिस्टर झाली असून 2019 मध्ये संपली, ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. पण काही गोष्टी उकरुन काढल्या आहेत. मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो, एखादा व्यक्ती अशा परिस्थितीत दोषी आहोत की नाही आहोत, घरच्यांना समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीनंतर ट्रॅप लावला, सगळं संभाषण टेप झालं, सगळी मागणी टेप झाली. मागणी टेप झाल्यानंतर पोलीस विभागाची खात्री पटली त्यानंतर सापळा रचला. पैसे देताना आरोपीला पकडलं. हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता, अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू. शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? याचा विचार आपण करायला हवा.






















