एक्स्प्लोर
Latur : कोथिंबीर पिकातून दोन महिन्यात 16 लाखांचं उत्पन्न
Latur : लातूर (Latur) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबीरीच्या (coriander) शेतीतून लाखोंचा नफा मिळवला आहे.
Success story agriculture news Latur
1/10

लातूर (Latur) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबीरीच्या (coriander) शेतीतून लाखोंचा नफा मिळवला आहे.
2/10

फळबागेला फाटा देत त्यांनी पालेभाज्या करण्याचा निर्णय घेतला. आज ते त्यातून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. रमाकांत वळके-पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
3/10

लातूर जिल्ह्यातील आशिव गावचे शेतकरी रमाकांत वळके-पाटील यांनी प्रयोगशील शेती केली आहे. कोथिंबीर पिकातून त्यांनी भरघोस उत्पन्न घेतलं आहे.
4/10

रमाकांत वळके -पाटील यांनी द्राक्ष, ऊस यासारख्या फळबागांचे प्रयोग केले. मात्र, खर्च वजा होता हाती निराशाच येत होती. शेती व्यवसायासह पीक पद्धतीचा अभ्यास करुन रमाकांत वळके पाटील यांनी शेतात वेगळा प्रयोग करायचे ठरवले.
5/10

उत्पन्न केवळ फळबागेतूनच पदरी पडते असे नाहीतर पालेभाज्यातूनही बळीराजा लखपती होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.
6/10

रमाकांत वाळके-पाटील यांच्या फळबागेच्या क्षेत्रावर आता कोथिंबीरची शेती बहरली आहे. गेल्या पाच वर्षांपासून रमाकांत वळके-पाटील हे कोथिंबीरचे उत्पादन घेत आहेत. यातून त्यांना वर्षाकाठी लाखोंचे नफा मिळत आहे.
7/10

image 7
8/10

लातूर जिल्ह्यातील आशिव या गावातील शेतकरी रमाकांत वळके पाटील यांना 20 एकर शेतजमिन आहे. यामध्ये पाच एकर क्षेत्रावर त्यांनी कोथिंबीर पिकाची लागवड केली आहे.
9/10

उत्पादन वाढीसाठी वाळके पाटील यांनी ऊस, द्राक्षे यासारख्या पिकांचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातून योग्य तो नफा न मिळाल्यामुळं मागील चार वर्षापासून त्यांनी कोथिंबीर लागवडीकडे लक्ष वळवलं आहे
10/10

पहिल्याच वर्षापासून लाखो रुपयांचा फायदा त्यांना मिळायला सुरुवात झाली. यावर्षी त्यांनी 16 लाख रुपयांचे उत्पन्न कोथिंबीरीच्या पिकातून मिळालं आहे. दोन महिन्याच्या आत आणि कमी खर्चामध्ये त्यांनी 16 लाखाचे उत्पादन कमावले आहे.
Published at : 30 Jul 2023 08:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
बातम्या
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
