एक्स्प्लोर
सोयाबीन कापूस प्रश्नावरुन तुपकर आक्रमक, अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात
सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton) प्रश्नावरुन रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुपकरांनी सोमठाणा (Somthana) या गावात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
Ravikant Tupkar
1/9

सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
2/9

तुपकरांनी चिखली तालुक्यातील जालना-खामगाव महामार्गावर असलेल्या सोमठाणा (Somthana) या गावात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
3/9

कापूस आणि सोयाबीनला सरकारनं लवकरात लवकर उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा या मागणीसाठी रविकांत तुपकर शेकडो शेतकऱ्यांसह आज रात्रीपासूनच अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.
4/9

यापुढे कापूस आणि सोयाबीन प्रश्नावर चिखली तालुक्यातील सोमठाणा हे गाव केंद्रबिंदू असेल अशी घोषणा रविकांत तुपकर यांनी केली.
5/9

सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर तोडगा नाही निघाला तर 29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेणारच असा इशारा देत तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
6/9

कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत रविकांत तुपकर यांनी 29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.
7/9

रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला
8/9

29 नोव्हेंबर रोजी मंत्रालय ताब्यात घेणारच अशी भूमिका पोलिसांना कळविल्याने रविकांत तुपकर यांना आज अटक करण्यात आली होती.
9/9

रविकांत तुपकर याना बिनशर्थ जामीन मंजूर झाला आहे. रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी रविकांत तुपकर यांची बाजू मांडली आहे.
Published at : 26 Nov 2023 12:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion