Viral Video: काही सेकंदात पकडले डझनभर मासे... मासे पकडण्याच्या भन्नाट ट्रिकचा व्हिडीओ व्हायरल
Fishing Viral Video: एक व्यक्ती तलावात उतरतो आणि अवघ्या काहीच सेकंदात मासे पकडतो, त्यासाठी त्याने भन्नाट ट्रिकचा वापर केल्याचं या व्हिडीओतून दिसतंय.
Viral Video: सोशल मीडियावर रोज निरनिराळे व्हिडीओ पोस्ट होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला अचंबित करुन टाकतात. असाच अचंबित करणारा एक व्हिडीओ समोर आला असून एक व्यक्ती तलावात उतरतो आणि मासे कसे पकडायचे (Fishing Viral Video) याचा डेमो दाखवतो. तलावात उतरुन अजब गजब पद्धतीने मासे पकडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मासेमारी करणे आपल्याला वाटते तितके सोपे नसते. त्यासाठी मासेमारीचं जाळं किंवा आकडा टाकणे गरजेचे असते. एवढं करुनही मासे हाताला लागतील याची शाश्वती काही देता येत नाही. पण या व्हिडीओतील व्यक्तीने असं काही केलं की काहीच सेकंदात त्याच्या हाती अगदी मोठमोठे मासे लागले.
Fishing Viral Video: मासे पकडण्याची युनिक पद्धत
या व्हिडीओमधील व्यक्तीने तलावात उतरुन मासे पकडण्यासाठी पाणी हाताने ढवळलं. तेव्हा पाण्यात हालचाल झाल्यामुळे तलावातील मासे पाण्यात उंच उड्या मारायला लागले. तलाव छोटा असल्यामुळे पाण्यातील मासे तलावाबाहेर पडू लागले. त्यानंतर बाहेर पोतं घेऊन उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने बाहेर आलेले मासे पटापट गोळा केले आणि पोत्यात टाकले.
View this post on Instagram
Fishing Viral Video: सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
हा व्हिडीओ सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत इंस्टाग्रामवर या व्हिडीओवर 67 हजारांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत तर आतापर्यंत 16 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यासारख्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मासे कसे पकडायचे याचं ज्ञानही अनेकांनी कमेंट्च्या माध्यमातून दिलंय.
फेविक्विकच्या जाहिरातीची आठवण
काही लोकांनी तर या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत त्यांनी या आधी मासे कसे पकडले याचे गमतीशीर अनुभवही शेअर केले आहेत. काही यूजर्सनी तर जुन्या फेव्हिक्विकच्या जाहीरातीचा संदर्भही दिला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती मासे पकडण्याच्या टेक्निकसह आकडा टाकून बसलेला असतो. पण बराच वेळ झालं तरी त्याच्या आकड्याला एकही मासा लागत नाही. त्याचवेळी एक गावठी व्यक्ती येतो आणि एका लहान काठीला फेविक्विकचे चार थेंब लावतो आणि ती काठी पाण्यात ठेवतो. काहीच सेकंदात त्या काठीला चार मासे चिकटतात आणि तो लगेच निघून जातो.
ही बातमी वाचा: