एक्स्प्लोर
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
इस शहर को हुआ क्या, कही आग कही धुआ... जाहिरातीमधील हे वाक्य कधी कधी पुणे, पिंपरी चिंचवड साठीच आहे की काय असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून पडत आहे.
Pimpari car broken by gundas
1/7

इस शहर को हुआ क्या, कही आग कही धुआ... जाहिरातीमधील हे वाक्य कधी कधी पुणे, पिंपरी चिंचवड साठीच आहे की काय असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून पडत आहे.
2/7

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाढलेली गुन्हेगारी, टोळीयुद्ध, नशेखोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
3/7

कालच पिंपरीतील एका वसाहतीमध्ये केवळ नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने एका माथेफिरुने 13 दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आरोपीला अटकही केली आहे.
4/7

आता, पिंपरी बीआरटी रोडवर एका टोळक्याने चक्क 10 ते 15 गाड्यांची विनाकारण तोडफोड केल्याचं पाहायला मिळत आहे. या चारचाकी कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत
5/7

पिंपरीतील KSB चौकापासून निगडीच्या दिशेने असलेल्या BRT रोडवर नागरिकांनी पार्क केलेल्या या 10 ते 15 गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
6/7

काही वेळेपूर्वी एका टोळक्या कडून या कारच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे कारचालकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
7/7

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दखल घेतली असून कारच्या काचा फोडणाऱ्या टोळक्याचा शोध घेतला जात असून परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.
Published at : 12 Mar 2025 09:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















