ठाकरेंना आणखी एक धक्का! डोंबिवलीत शेकडो तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
Shinde Group vs Thackeray Group : लोकांना विकासाचं राजकारण आवडतं, दररोज उठून एकमेकांना शिव्या घालणं, टोमणे मारणं, शिव्या शाप देणं आणि टीका करणं लोकांना या गलिच्छ राजकारणाचा कंटाळा आलाय, असं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

Maharashtra Politics: डोंबिवलीत ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का बसला असून डोंबिवलीतील (Dombivli) शेकडो तरुणांनी शिवसेनेमध्ये (शिंदे गट) प्रवेश केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदें (MP Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी लोकांना विकासाचं राजकारण आवडतं, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कामाला प्रेरित होऊन डोंबिवलीत शेकडो तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
शिवसेना (शिंदे गट) खासदर श्रीकांत शिंदे डोंबिवलीतील तरुणांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना म्हणाले की, "लोकांना विकासाचं राजकारण आवडतं, दररोज उठून एकमेकांना शिव्या घालणं, टोमणे मारणं, शिव्या शाप देणं आणि टीका करणं लोकांना या गलिच्छ राजकारणाचा कंटाळा आला आहे." तसेच, डोंबिवलीमध्ये शेकडो तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाला प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे, असंही खासदार शिंदे म्हणाले.
"विकासाच्या राजकारणावर विकास कामं होत आहेत आणि हेच लोकांना अपेक्षित आहे. त्यामुळे लोक मोठ्या संख्येनं शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेला यश प्राप्त झालं आहे. लोकांना विकासाचं राजकारण आवडतं, रोज उठून एकमेकांना शिव्या घालणं, टोमणे मारणं, शिव्या शाप देणं आणि टीका करणं, लोकांना या गलिच्छ राजकारणाचा कंटाळा आला आहे.", असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
लोकांना विकासाचे राजकारण पाहिजे जे काम महाराष्ट्रामध्ये होतंय त्याला प्रभावित होऊन अनेक तरुण शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेशी जोडत राहतील, अशी आशा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अजित पवारांच्या गटात आणखी एका 'पुतण्या'ची एन्ट्री होणार, बीडच्या सभेत होणार पक्षप्रवेश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
