एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाची महापूजा
एखाद्या मंदिरापूढे लावण्यात येणाऱ्या पाटीप्रमाणे इथे बोर्ड लावण्यात आला असून, सर्वांनी पूजेच्या तिर्थप्रासादाचा लाभ घ्यावा असं लिहिण्यात आलं आहे.
पुणे : पुणे शहरातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आली. त्यामुळे शिक्षणालय असणाऱ्या वास्तूला देवालय बनवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून घेण्यात आला आहे. या सत्यनारायणाच्या महापूजेला लोकतांत्रिक जनता दल संघटनेने आक्षेप घेण्यात आला.
फर्ग्युसन महाविद्यालयाचे मुख्य कार्यालय असणाऱ्या इमारतीमध्ये ही महापूजा घालण्यात आली आहे.
विशेष म्हणजे एखाद्या मंदिरापुढे लावण्यात येणाऱ्या पाटीप्रमाणे इथे बोर्ड लावण्यात आला असून, सर्वांनी पूजेच्या तिर्थप्रासादाचा लाभ घ्यावा, असं लिहिण्यात आलं आहे.
देश-विदेशातील सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतात. मात्र, फर्ग्युसनमध्ये घालण्यात आलेल्या महापूजेने कॉलेज प्रशासन धार्मिक रुढीचं उदात्तीकरण करत आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement