एक्स्प्लोर

Pune Accident : सिग्नल सुटला अन् भरधाव वेगात कंटेनरनं दुचाकीला चिरडलं; आई-वडिल्यांच्या डोळ्यादेखत जुळ्या मुलींचा करुण अंत

पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच पुण्यात झालेल्या अपघातात दोन जुळ्या बहिणींचा करुण अंत झाला आहे.

पुणे : पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच (Pune Accidnet) पुण्यात झालेल्या अपघातात दोन जुळ्या बहिणींचा करुण अंत झाला आहे. विश्रांतीवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीला टँकरची (Pune Accident) धडक बसून झालेल्या अपघातात दोन जुळ्या मुलींचा मृत्यू झाला आहे तर त्यांच्या आई-वडिल गंभीर जखमी झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कुमार झा (40) हे आपल्या 3 वर्षांच्या जुळ्या मुली आणि पत्नीसह दुचाकीवरून जात असताना विश्रांतीवाडी चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबले होते. दिवा हिरवा होताच मागून येणाऱ्या पेट्रोल टँकरने मोटारसायकलला धडक दिली.  श्रद्धा आणि साक्षी अशी मृत्यू झालेल्या दोघींची नावं आहेत. 

या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताच्या व्हिडिओंमध्ये ट्रॅकर चालकालाची चूक असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धावपळ सुरु केली. चारही जणांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी गडबड सुरु होती. मात्र तेव्हाच दोघींचा करुण अंत झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. या अपघातात आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर वडिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. पेट्रोल टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे.

नवले पुलाजवळही ट्रक पेटला अन्...

काल रात्री (17 ऑक्टोबर) पुण्यातील नवले पुलाजवळ जीवघेणा अपघात झाला होता. कंटेनरची धडक झाल्याने ट्रकने पेट घेतला आणि त्याला आग लागली होती. या आगीत ट्रकच्या केबीनमध्ये बसून प्रवास करणारे चारजण होरपळून मृत्यूमुखी पडलेत. तर इतर जखमी झालेत.  ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं होतं.  हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ काल (16 ऑक्टोबर) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. मक्याचा भुसा घेऊन साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला असता, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कंटेनर रस्त्यावरच उलटला. मात्र धडक मोठी बसल्याने ट्रकला क्षणातच आग लागली. यात ट्रकच्या केबिन मध्ये बसलेले चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले. मात्र तोपर्यंत वाहतूक  विस्कळीत झाली होती. 

इतर महत्वाची बातमी-

Akola News: ..अन् मुलाच्या वयाच्या प्रियकराच्या मदतीनं 'तिनं' पतीला संपवलं, अकोल्यात अंगावर शहारे आणणारी घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget