Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राला जगभरातील वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासोबत 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले.
Sangli: दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रासोबत अनेक कंपन्या गुंतवणूक करत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला डिवचले आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले !असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मोठी बातमी ! दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 5 लाख कोटींची गुंतवणूक, दुसऱ्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी एकुण 54 समंजस करार दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून अशा बातम्या रोज येत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले ! कारण मागील वर्षीही अशाच प्रकारच्या बातम्या येत होत्या. असंही ते म्हणालेत. (Davos Investment)
काय म्हटलंय जयंत पाटलांनी?
दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राला जगभरातील वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. यावर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मागच्या वर्षीही अशाच बातम्या येत होत्या. त्या करारांचे काय झाले असा सवाल करत प्रत्यक्षात किती गुंतवणूक करण्यात आली हे राज्यकर्त्यांनाच ठाऊक. यंदाही गुंतवणुकीची मोठी यादी सरकारनं मांडली आहे. या गुंतवणूकी फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात याव्यात, लोकांना रोजगार मिळावा एवढीच अपेक्षा असल्याचं ते म्हणाले.
मोठी बातमी! दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींची गुंतवणूक, दुसऱ्या दिवसापर्यंत १५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी एकूण ५४ समंजस करार
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 25, 2025
दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून अशा बातम्या रोज येत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे. पण ही… pic.twitter.com/W6zAchuPWb
'मोठ्या मोठ्या वल्गना..': जयंत पाटील
x माध्यमावर पोस्ट करत त्यांनी सरकारला डिवचल्याचं दिसलं. मागील वर्षीच्या दावोसमधील करारांचे उदाहरणं देत त्या करारांचे काय झालं असा सवालही त्यांनी केलाय. ते म्हणाले, उदा. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 हजार कोटींचा करार, जिंदाल यांच्यासमवेत 41 हजार कोटींचा करार, हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी 56 हजार कोटींचा करार..या करारांचं पुढे काय झाले, प्रत्येक्षात किती गुंतवणूक आली हे राज्यकर्त्यांनांच ठाऊक. यंदाही गुंतवणुकीची मोठी यादी सरकारने मांडली आहे. मोठ्या मोठ्या वल्गना केल्याचे दिसून येत आहे. या गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात, लोकांना रोजगार मिळावा व महाराष्ट्राची भरभराट होवो इतक्याच शुभेच्छा ! असं ते म्हणाले.
हेही वाचा:
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार