एक्स्प्लोर

Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!

Girish Mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर गिरीश महाजनांनी मोठं वक्तव्य केलंय.

Girish Mahajan : राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Minister List) जाहीर करण्यात आली. मात्र, यात रायगडमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) आणि रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केल्याने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय अवघ्या एका दिवसात स्थगित करण्यात आला. यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. आता या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

आज शनिवारी (दि. 25) त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा पार पडली. दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते ही शासकीय पूजा पार पडते. मात्र यंदा नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती असल्याने गिरीश महाजन यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. शासकीय पूजेनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला आज दुसऱ्यांदा योग आला. काल अमितभाई यांच्यासोबत इथे आलो होतो. आज पुन्हा पूजेसाठी आलो. मी चौथ्यांदा इथे पूजा केली. कुंभमेळा मंत्री म्हणून माझं नाव घोषित झाले आहे. आपण सुरक्षित कुंभमेळा करू, आम्ही तयारीला सुरुवात केली आहे, असे त्यांनी म्हटले. 

आपल्याकडे 33 कोटी देव

गिरीश महाजन यांना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या तिढ्याबाबत विचारले असता त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. गिरीश महाजन म्हणाले की, पालकमंत्री पदाबाबत देवालाच माहिती, आपल्याकडे 33 कोटी देव आहेत. रायगड आणि नाशिकबाबत चर्चा करून प्रश्न सुटेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

भुजबळ साहेब जेष्ठ नेते 

शुक्रवारी (दि. 24) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिक दौऱ्यावर आले होते. मालेगाव येथील एका कार्यक्रमात अमित शाह आणि राष्ट्रवादी अजित पवार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे एकाच मंचावर आले होते. अमित शाह यांनी भुजबळ यांना आपला शेजारच्या खुर्चीत बसायला लावले. दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवाद देखील झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, मला वाटतं तो कार्यक्रम भाजपचा नव्हता. त्या कार्यक्रमाचे सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले होते. ते भाजपच्या कार्यक्रमाला आले नव्हते.  भुजबळ साहेब जेष्ठ नेते आहे. साहजिक आहे अमित शाह यांनी त्यांना खुर्ची दिली. मी लहान कार्यकर्ता आहे. त्यांच्या प्रवेशाबाबत वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
Embed widget