Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhymantri Majhi Ladki Yojana) जानेवारीच्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच सातव्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. आदिती तटकरे यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 जानेवारीपूर्वी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
आदिती तटकरेंनी दिली माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती दिली. 24 जानेवारी म्हणजेच पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली. 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे.
आतापर्यंत 10500 रुपये जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जुलै 2024 पासून सुरुवात करण्यात आली होती. या योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट महिन्यात एकाच वेळी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जानेवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळेल. म्हणजेच एका लाभार्थी महिलेला 10500 रुपयांची रक्कम मिळालेली आहे.
2100 रुपयांचा निर्णय अर्थसंकल्पानंतर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिला होतं. महायुतीच्या नेत्यांनी त्यांचं सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पानंतर त्याबाबत निर्णय होईल, असं सांगितलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळतील, अशी शक्यता आहे.
डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खात्यात 24 डिसेंबरला रक्कम वर्ग करण्यात आली होती. आता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 जानेवारीला रक्कम वर्ग करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 24, 2025
जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जानेवारी २०२५ पर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, २६ जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी… pic.twitter.com/fU5dIUr8xe
इतर बातम्या :
महिन्याला फक्त 600 रुपयांची बचत करा, कमी काळात लाखो रुपये मिळवा, गुंतवणुकीसाठी 'ही' आहे भन्नाट योजना