एक्स्प्लोर

Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी

Bhandara : भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत काल (24 जानेवारीला) भीषण स्फोट झालला या प्रकरणी आता भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी 9 सदस्यीय एक एसआयटी गठीत केली आहे.

Bhandara News : भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत काल(24 जानेवारीला) भीषण स्फोट (Bhandara Factory Explosion) झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर, 5 कामगार हे मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी, यासाठी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी 9 सदस्यीय एक एसआयटी गठीत केली आहे. या एसआयटीत आयुध निर्माणी कंपनीतील कुणाचाही समावेश नसल्यानं ही चौकशी समिती निष्पक्षपणे चौकशी करेल, असा विश्वास निरुल हसन यांनी व्यक्त केला आहे.

संतप्त ग्रामस्थांचा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

दरम्यान, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात 20 वर्षीय अप्रेंटिस धारक अंकित बारई हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अंकित बारईचे कुटुंबिय आक्रमक झाले आहेत. आर्थिक मदतीसह कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावेश करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. शिवाय मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह घरी नेणार नाही, असा आक्रमक पवित्रा बारई यांच्या कुटुंबियांनी घेतलाय. तर आज पुन्हा संतप्त ग्रामस्थांनी  आयुध निर्माण फॅक्टरीच्या प्रवेश द्वारावर आंदोलन सुरू केलं आहे. साहुली गावातील २० वर्षीय अंकित बाराई या अप्रेंटीस करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरीतील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक झाली पाहिजे, अशा घोषणा देत गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे, अशी मागणी या ग्रामस्थाकडून केली जात आहे.

मृतक कामगारांचे आज होणार शवविच्छेदन; मात्र कुटुंबियांचा आक्रमक पवित्रा 

ऑर्डनन्स फॅक्टरीतील भीषण  स्फोटमध्ये 8 कामगारांचा मृत्यू झाला होता. त्या 8 कामगारांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून आज (25 जानेवारी) त्यांचे शवविच्छेदन होणार आहे. एक मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला असून उर्वरित 7 मृतदेह हे जिल्हा रुग्णालयात आहेत. मात्र मृतक कामगारांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदतीची मागणी, तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असी आक्रमक भूमिका घेतल्याने आज प्रशासनाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होणार आहे.

आयुध निर्माणी कंपनीतील भीषण स्फोटाच्या घटनेनंतर घटनास्थळावर एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक पोहोचलं होतं. या पथकाला बचाव कार्य करून तेरा जणांना मालब्याखालून बाहेर काढलं होतं. त्यातील आठ जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळावर बचाव पथक कार्य करतानाचे महत्त्वाचे व्हिडिओ आणि फोटोज एबीपी माझाच्या हाती लागले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Ordance Factory Blast : भंडारा आयुध निर्माणी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती दुर्घटनेची करणार  चौकशी
भंडारा आयुध निर्माणी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडेManoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा आयुध निर्माणी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती दुर्घटनेची करणार  चौकशी
भंडारा आयुध निर्माणी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Embed widget