एक्स्प्लोर

Maratha Reservation : पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा कार्यकर्त्यांकडून सरकारचा दशक्रिया विधी; मुंडण करुन निषेध

पिंपरी चिंचवडमध्ये मराठा आरक्षणाचे आणखी पडसाद उमटत आहेत. मराठा क्रांती मोर्चाने तर आज चक्क सरकारचा दशक्रिया विधी घातला.

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये मराठा आरक्षणाचे आणखी पडसाद उमटत (Maratha Reservation) आहेत. मराठा क्रांती मोर्चाने तर आज चक्क सरकारचा दशक्रिया विधी घातला. आरक्षण देऊ, या आश्वासनाचा विसर पडलेलं सरकार मृत पडलंय. त्याच मृत सरकारचा मराठा क्रांती मोर्चाने दशक्रिया विधी घातला. चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिर घाटावर हे आंदोलन पार पडलं. दशक्रियेचे सर्व विधी पार पाडतानाचा काही मराठा बांधवांनी मुंडन ही केलं. मृतावस्थेत असणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा बांधवांनी असा पवित्रा घेतला. 

राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी 40 दिवसांता अल्टिमेटम दिला होता. मात्र, या 40 दिवसात सरकारने मराठा आंदोलनाची दखल घेतली नाही आणि आरक्षणदेखील दिलं नाही, साधी चर्चा केली नाही त्यामुळे आम्ही सरकार मेलं असं सांगत सरकारचा दशक्रिया विधी करत आहोत. मागील काही दिवस मराठे शांत होते. मात्र त्यानंतर सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठ्यांचे लोक आत्महत्या करत आहेत. सगळ्या राज्यात आंदोलनं केली जात आहे. मात्र तरीही सरकारला जाग येताना दिसत नाही आहे. याच मेलेल्या शासनाला जागं करण्यासाठी मुंडण करत दशक्रिया विधी केला असल्याचं सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी सांगितलं आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी मराठ्यांचं साखळी उपोषण सुरु आहे. अनेक ठिकाणी मराठे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील गावागावात उपोषण सुरु आहे. भोर, वेल्हा, आंबेगाव, मुळशी, हडशी, काशीग या सारख्या लहानमोठ्या गावात मराठे एकवटले आहे. मराठ्यांचे कुटुंब अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरु करताना दिसत आहे. सोबतच महिला आणि लहानग्यांचादेखील समावेश आहे. 

पुण्यात ठिकठिकाणी आंदोलन

औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे, बोपोडी आणि शिवाजीनगर येथील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चासह अनेक मराठा संघटनांनी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात आजपासून सुरू होत आहे. 

गोंधळाचं वातावरण 

पुणे  - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग नवले पुलाजवळ अडवला आहे. मराठा आदोलकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे नवे पुलाजवळील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Maratha Reservation : मराठ्यांसाठी मुस्लिम मावळे एकवटले; पुण्यात मुस्लिम बांधवांकडून 'एक मराठा, लाख मराठा'चा गजर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget