Pune :पुण्यात मध्यरात्री पलटी झालेल्या टँकरमुळे अजूनही धाकधूक, विषारी वायूगळतीमध्ये भीतीचे वातावरण
Pune News : वडगाव शेरी चौकालगत टँकर पलटी होऊन वायुगळती झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.

Pune News : पुण्यातील वडगाव शेरी चौकामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावर ही दुर्घटना घडली. मध्यरात्री ही दुर्घटना घडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. टँकरमध्ये एथिलीन ऑक्साइड घेऊन जाण्यात येत होते. यामध्ये आग लागू शकते अथवा जोरदार धमका होण्याची भीती असते. टँकर चालक त्या दुषीत हवेमुळे आजारी पडल्याचेही समोर आलेय. पुणे प्रशासनाकडून टँकर बाजूला करण्याचे काम सुरु आहे. जवळपास 8 अग्निशामन दलाच्या गाड्या, पुणे पोलिसांसह प्रशासनाची इतर पथकेही घटनास्थळी उपस्थित आहेत.
पुणे महानगरपालिकेकडून आवाहन -
वडगाव शेरी चौकालगत टँकर पलटी होऊन वायुगळती झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असून नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सतर्क रहावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहान पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेय.
पोलिासांनी काय सांगितले ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे अहमदनगर राज्य महामार्गावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. पुण्यातील वडवाग शेरी चौकामध्ये टँकर पटली झाला. पुणे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्याला मध्यरात्री 12.47 मिनिटांनी याबाबतची माहिती मिळाली. एका खासगी रासायनिक कंपनीद्वारे टँकरमधून एथिलीन ऑक्साइड घेऊन जाताना ही दुर्घटना घडली. टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात एथिलीन ऑक्साइड होते. हे अधिक ज्वलनशील, विषारी रसायन होय. पोलिसांनी वेळीच टँकरच्या आजूबाजूचा परिसर बंद केला. बॅरिकेडिंग करण्यात आले. पुणे फायर ब्रिगेड आणि पोलिसांच्या पथकाने या स्थितीला संभाळले. घटनास्थळावर पोलिस आणि अग्निशामन दलाच्या जवांन जवान तैणात आहेत. टँकर बाजूला करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.
पाहा व्हिडीओ -
#WATCH | Maharashtra: A gas tanker carrying ethylene oxide overturned on Pune-Ahmednagar road this morning, traffic affected: Pune Fire Department
— ANI (@ANI) November 27, 2023
Pune Fire Department team is on the spot. Efforts are underway to empty the tank, experts from Reliance Petrochemicals are present… pic.twitter.com/98nyM2vVAA
रहदारीच्या ठिकाणी टँकर पलटी झाला होता. पुणे अहमदनगर रोडवरील वडगाव शेरी चौकात दिवसरात्र रहदारी असते. येथे मोठ्या प्रमाणात लोकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाच्या विविध पथकांनी घटनास्थळी जाऊन नियंत्रण केले. या ठिकाणी अग्निशामन दलाच्या आठ तुकड्या तैणात होत्या. यावरुन घटनेचे गंभिर्य समजू शकता. अग्निशामन दलाकडून टँकरवर वारंवार पाणी टाकण्यात येतेय, जेणेकरुन विषारी वायू मुळे कोणताही दुर्घटना घडू नये.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
