एक्स्प्लोर

Chhaava Movie Box Office Collection : भारत-पाकिस्तान सामन्याचा 'छावा'ला फटका; रविवार असूनही कमाई फक्त...

Chhaava Box Office Collection: रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत यांच्यातील क्रिकेट सामन्यामुळे छावा या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर काही अंशी फटका बसल्याचे दिसून आले आहे.

Chhaava Movie Box Office Collection : 'छावा' चित्रपटातून (Chhaava Movie) छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा आणि पराक्रम रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. सध्या हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशा परिस्थितीत 'छावा' बॉक्स ऑफिसवर (Chhaava Box Office Collection) दररोज धमाकेदार कमाई करत आहे. या चित्रपटानं  अवघ्या 10 दिवसांत 440  कोटी रुपयांचे कलेक्शन केल्याचे सांगितलं जातंय. तर 'छावा'नं (Chhaava) रिलीज होताच अनेक दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. 

दरम्यान, देशभरात छावा चित्रपटाची घौडदौड सुरू असतांना गेल्या शनिवार-रविवार या वीकएंडला छावा चित्रपट मोठी उसळी घेत अधिक  नफा कमवत उच्चांक गाठेल, अशी अपेक्षा होती. मात्र  रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत यांच्यातील क्रिकेट सामन्यामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर काही अंशी फटका बसल्याचे दिसून आले आहे. रविवार असून देखील प्रेक्षकांनी शनिवारच्या तुलनेत थिएटरकडे फारशी गर्दी केली नसल्याने चित्रपटाचे रविवारी मात्र मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

दहाव्या दिवशी 'छावा' चित्रपटाने किती केली कमाई?

'छावा' चित्रपटाचं प्रोडक्शन हाऊस असलेल्या मॅडॉक फिल्म्सच्या (Maddock Films) मते, 'छावा' चित्रपटानं पहिल्या दिवशी 33.1 कोटी रुपयांची कमाई करून भारतात बॉक्स ऑफिसवर आपलं खातं उघडलं आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 39.3 कोटी रुपये कमावले, तर तिसऱ्या दिवशी 49.03 कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला. तर घरगुती बॉक्स ऑफिसवर फिल्मनं 6 दिवसांत एकूण 180.46 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. सोबतच जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने आतापर्यंत 9 दिवसांत तब्बल 393.35 कोटी रुपये कमावले आहेत. तर हेच आकडे 10 दिवसांत सुमारे 440 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

क्लायमॅक्स पाहून न कळत डोळ्याच्या कडा पाणावतात

'छावा'मध्ये छत्रपती शंभू राजांचं बलिदान, त्यांची शौर्य, पराक्रम आणि त्याग दाखवण्यात आला आहे. 'छावा'मधला क्लायमॅक्स पाहून तर डोळ्याच्या कडा पाणावतात आणि आपला राजा किती पराक्रमी होता, याची जाणीवर करुन देतो.  'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. तर, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. तर, साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत बॉलिवूड स्टार अक्षय खन्ना दिसून आला आहे. अशातच यासर्वांव्यतिरिक्त दिव्या दत्ता, आशुतोष राणा आणि विनीत कुमारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
Bigg Boss Marathi 6: एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..
‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीची चाहत्यांना गुड न्यूज, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीची चाहत्यांना गुड न्यूज, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget