Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Manikrao Kokate : धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी 275 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय.

Manikrao Kokate : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh) आरोपी वाल्मिक कराडमुळे (Walmik Karad) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे विरोधकांच्या रडारवर आले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप केलाय. मात्र, कृषी साहित्य घोटाळ्यासंदर्भात सध्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी एका वाक्यात उत्तर दिलंय.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ते कृषीमंत्री असताना जवळपास 275 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे कृषीमंत्री होते. त्यावेळी कृषी साहित्य खरेदी करण्यात आले होते. कृषी साहित्य खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. बाजारभावापेक्षाही अधिक दराने साहित्य खरेदी करण्यात आले. त्याशिवाय, साहित्य खरेदीच्या निविदा खुल्या करण्याआधीच रक्कमेचे वाटप संबंधित कंपनीला करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर
तर, दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. सगळी खरेदी प्रक्रिया ही नियमानुसार झाल्याचा दावा मुंडे केला होता. तर, एबीपी माझाने केलेल्या रिऍलिटी चेकमध्ये कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. कृषी विभागाने जादा दरानेच साहित्य खरेदी केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागातील विविध साहित्य खरेदी घोटाळ्यासंदर्भात विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. मी अजून माहिती घेतली नाही माहिती घेऊन सांगतो, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
मग कृषि विभाग धोरणात्मक निर्णय घेईल
दरम्यान, माणिकराव कोकाटे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, स्पेशल अजेंडा वगैरे घेऊन आलेलो नाही, शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हितगुज करण्यासाठी आलेलो आहे. राज्य सरकारच्या योजना, त्यामध्ये सुधारणा, काही बदल हवा आहे का? याबाबत चर्चेसाठी आलो आहे. औषधे, खते, नवीन तंत्रज्ञानाबाबत काही सूचना करायच्या आहेत का? या सगळ्या सूचना मला शेतकऱ्यांकडून घ्यावयाच्या आहेत. मग हा डेटा गोळा केल्यावर कृषि विभाग धोरणात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंना कोर्टाची कारणे दाखवा नोटीस, माहिती दडवल्याचा आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

