Karuna Sharma on SeeShiv Munde : पोस्ट करण्यासाठी धनंजय मुंडेंचा सिशिववर दबाब; अनेक फोन केले, करुणा शर्मांचे गंभीर आरोप
Karuna Sharma on SeeShiv Munde : पोस्ट करण्यासाठी धनंजय मुंडेचा सिशिववर दबाब; अनेक फोन केले, करुणा शर्मांचे गंभीर आरोप

Karuna Sharma on SeeShiv Munde : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कोर्टाने घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलंय. त्यामुळे धनंजय मुंडे यांना करुणा शर्मांना पोटगी द्यावी लागणार आहे. दरम्यान, न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने आई करुणा शर्मा यांच्यावर आरोप केले आहेत. सिशिव मुंडे याने धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली आहे. वडिल आईसोबत कठोर असले तरी ते आमच्यासोबत कठोर नाहीत, असं सिशिव मुंडे याने म्हटलंय. शिवाय आईने घरुगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, तिच आम्हा सर्वांचा छळ करते असं देखील सिशिव याने म्हटलंय. यावर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
करुणा शर्मा म्हणाल्या, मुलगा म्हणालाय ते खरं आहे. धनंजय मुंडे यांचे माझ्या मुलांसोबत चांगलं नात होतं. त्यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. आजची पत्रकार परिषद माझी आहे, ती कोर्टाच्या निकालावर होती. माझ्या मुला बाळांवर देखील दबाव येतोय. तुम्ह हे समजून घेतलं पाहिजे. मुलांना काय वाटतं आणि मुलांच्या वडिलांना वाटतं की मी मीडियात बोलू नये. किंवा कोर्टात जाऊ नये, असं त्यांना वाटतं. हे 2019 पासून मिडिया ट्रायल सुरु आहे, हे त्यांना छळ वाटतोय.
आमच्या मला-मुलांना हे वाद नको आहेत. ते म्हणतात, तुम्ही कोर्ट केस संपवून टाका. आज निकाल लागलाय, त्याला मी काय करणार? मी याबाबत काय वाईट देखील बोललेले नाही. कोर्टाने निकाल दिलाय, त्याबाबतचं मी बोलत होते. माझ्या नवऱ्याचा सातत्याने मुलाला फोन येत होता, जेव्हा मी मीडियाशी बोलत होते. मी रखेल बनून जगू शकत नाही. मी बोलत राहणार नाही, असंही करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.
पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, माझा नवरा आणि मी मिळून आमच्या मुलांना छळतोय, हे खरं आहे. हे मी मान्य करते. माझी मुली माझ्यासोबत राहतात. माध्यमांतील प्रतिनीधींना देखील याबाबत माहिती आहे. त्यांच्यावर सातत्याने दबाव असतो. त्याच्यावर पोस्ट टाकण्यासाठी दबाव आहे. तो खूप लहान आहे. तो गेल्या अनेक वर्षापासून सहन करतोय. त्यांचा खरोखर छळ सुरु आहे. ज्या माझ्या वाईट गोष्टी आहेत, त्या मी मान्य करते. माझ्या नवऱ्याला हे समजत नाही. माझ्या मुलांवर धनंजय मुंडेंचा दबाव आहे. धनंजय मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय, तो मंत्री आहे. मुला बाळांना जेलमध्ये जायचं नाही. त्यांना केसेस नको आहेत. ते म्हणातात, आम्हाला यामध्ये पडायचं नाही. कर्जाबाबत त्याने केलेल्या आरोपांवर मी पुरावे देऊ शकते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

