एक्स्प्लोर

Nashik Sambhajiraje  : मराठा आरक्षणाबाबत मागच्या अन् आताच्या सरकारला जाब विचारणार : छत्रपती संभाजीराजे

Nashik News :मराठा आरक्षणाबाबत सरकारला जाब विचारणार असल्याची भूमिका छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी व्यक्त केली. 

नाशिक : 'इतके दिवस गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवले? मी संसद आवारात जाऊन आंदोलन केलं. राणे समितीने आरक्षण दिलं, ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील आरक्षण टिकलं नाही. या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. आजच्या बैठकीत मी मागच्या सरकारला आणि या सरकारला देखील जाब विचारणार असल्याची भूमिका छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी व्यक्त केली. 

जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी गावात आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jrange Patil) यांच्या मागण्यांवर आज सर्वपक्षीय बैठक (All Party Meeting) होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी संभाजीराजे मुंबईला रवाना झाले आहेत. तत्पूर्वी दोन दिवसांपासून नाशिक (Nashik) दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन असल्याचे सांगत मागील सरकारसह आताच्या सरकारला देखील याबाबत जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा तिढा सुरूच आहे, अनेकदा समित्या स्थापन करूनही टिकणार आरक्षण मराठा समाजाला (Maratha Arakshan) मिळालेले नाही, येऊ दुर्दैवी असल्याचे संभाजीराजे म्हणाले. 

संभाजीराजे म्हणाले की, आज सर्वपक्षीय बैठक आहे, कालच मुख्यमंत्री, गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा फोन आला होता. समाजासाठी मी उपस्थित राहील.. सरकारने सर्व पक्षीय नेत्यांना बोलवलं, याचं कौतुक आहे. भावना आणि न्यायिक भूमिका यांचा समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा समाज आहे. इतके दिवस गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवले? मी संसद आवारात जाऊन आंदोलन केलं.. राणे समितीने आरक्षण दिलं, ते टिकलं नाही.. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात देखील आरक्षण टिकलं नाही..या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, हे दुर्दैवी आहे.. मी मागच्या सरकारला आणि या सरकारला देखील जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. 

कृषी मंत्री उत्तरसभांमध्ये बिझी 

एकीकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड (Beed) जिल्ह्यात आत्महत्या (Suicide) वाढत असून ही बाब महाराष्ट्राची चिंताजनक आहे. यावर संभाजीराजे म्हणाले कि, शेतकरी आत्महत्या वाढत आहे. ब्रिटिशांनी सुरु केलेले कृषी धोरण असून अजूनही त्यात बदल झाला नाही. लाँग टर्म पॉलिसी यायला हवी. कृषी मंत्री सध्या उत्तर सभा यात बिझी आहे. जे काही राजकारणात चालू आहे, त्यात लोकांना इंटरेस्ट नाही, महाराष्ट्रातील जनतेकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तर सातारा (satara) जिल्ह्यात सोशल मीडिया पोस्टवरून चांगलाच वाद निर्माण झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून अन्य काही जण जखमी झाले आहेत. या घटनेवर बोलताना संभाजीराजे म्हणाले की अलीकडे सोशल मीडियावरून सामाजिक तणाव वाढत आहेत, यासाठी सरकारने कडक कायदा आणावा. तसेच वातावरण दूषित करणाऱ्या लोकांना थांबवलं पाहिजे, असा सल्लाही संभाजीराजे यांनी दिला. 


इतर महत्वाची बातमी : 

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक, कोणाकोणाला निमंत्रण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Embed widget