(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Accident : तीन मित्र जेवणासाठी दुचाकीवर बाहेर पडले, मात्र तत्पूर्वीच.... दोघेही घरात एकुलते एक
Nashik Accident : नाशिक शहरात रात्रीच्या सुमारास जेवण करण्यासाठी बाहेर पडलेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला.
Nashik Accident : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. रोजच कुठे ना कुठे दुचाकी, चारचाकी वाहनाच्या अपघातात मृत्यूच्या घटना वाढत आहेत. नाशिक शहरात काल रात्रीच्या सुमारास जेवण करण्यासाठी बाहेर पडलेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला असून दुचाकी अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
नाशिक शहरात अपघातांच्या (Accident) घटना नित्याच्या झालेल्या दिसून येतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) वारंवार जनजागृती होत असताना अपघाताच्या घटनांना निमंत्रण दिले जात आहे. अशातच नाशिक शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या सीबीएस परिसरात दुचाकी एसटी बसच्या अपघाताच्या घटना घडली आहे. शिक्षणाच्या निमित्ताने नाशिक शहरात वास्तव्यास असलेले तीन मित्र हॉटेल्स व खानावळी बंद झाल्याने मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास नवीन सीबीएस अथवा जुने सीबीएस (CBS) परिसरात जेवण मिळेल, या आशेने सिडकोकडून ठक्कर बाजार येथील नवीन सीबीएस येथे दुचाकीवर आले. मात्र यावेळी त्यांची दुचाकी दुचाकी एसटी बसवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थी जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी माहितीनुसार, अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार परिसरात जेवण करण्यासाठी येत होते. याचवेळी त्र्यंबक नाका सिग्नलकडून वेगात येणारी बस नवीन सीबीएसकडे वळत असताना सिडकोकडून त्र्यंबकरोडने ठक्कर बाजारकडे येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची दुचाकी बसवर भरधाव दिलेल्या वेगात आदळली. बसच्या लगेज बॉक्सवर दुचाकी धडकल्याने भीषण अपघात झाला. यावेळी दुचाकीवर ट्रिपलसीट असलेल्या शुभम प्रशांत सोनवणे, शुभम संतोष कोकाटे व जयेश महाजन तिघेही रस्त्यावर आदळले. यात शुभम कोकाटे व शुभम सोनवणे जागीच ठार झाले. तर जयेश महाजन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मृतांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु हाेते.
दाेन्ही शुभम् कुटुंबात एकुलते एक
दरम्यान अपघातातील दोन्ही मृत विद्यार्थी हे नाशिक शहरातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तर सिडको परिसरात वास्तव्यास होते. दाेन्ही शुभम् कुटुंबात एकुलते एक हाेते. शुभम् साेनवणे हा शिक्षणसाठी जळगाव येथून नाशिकमध्ये आला हाेता. काल मध्यरात्री ते जेवण करायच्या निमित्ताने सीबीएसला दुचाकीवर निघाले. सोबत जयेश महाजन हा तिसरा मित्र देखील होता. ते दुचाकीवर बसून भरधाव वेगात सिडकाेतून त्र्यंबकराेडकडे येत हाेते. हाॅटेल बंद हाेतील, जेवण मिळायला हवे, या उद्देशाने ते जिल्हा रुग्णालयाकडून त्र्यंबकराेडकडे येत असताना धाडीवाल हाॅस्पिटलसमाेरील रस्त्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या टूलबाॅक्सवर पाठीमागून जाऊन आदळले. त्यात गंभीर जखमी हाेऊन दाेघांचा मृत्यू झाला.