एक्स्प्लोर

Nashik News : अपघात झाला, आता पोलिसच फिर्याद दाखल करणार; नाशिक शहर पोलीस आयुक्तांचा निर्णय 

Nashik News : नाशिक पोलिस आयुक्तांनी महत्वाचा निर्णय घेतला असून शहरातील अपघाताच्या घटनांत स्वतः पोलिसच फिर्यादी असणार आहेत. 

Nashik News : नाशिक शहरात (Nashik) अपघाताच्या घटना रोजच घडत आहेत. कधी दुचाकीस्वार तर कधी चार चाकी वाहनांमुळे अनेकदा अपघात होतात. मात्र अनेकवेळा दोन्ही पक्षाकडून त्यांची बाजू लावून धरली जाते. यामुळे अपघात नेमका कसा झाला किंवा कुणाच्या चुकीमुळे झाला हे लक्षात येत नाही. यावर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला असून आता यापुढे नाशिक शहरातील अपघाताच्या घटनांत स्वतः पोलिसच फिर्यादी असणार आहेत. 

नाशिक शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये वाढ होत असून या घटनांची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला (Police Station) केली जाते. मात्र अनेकदा योग्य माहिती न मिळाल्याने तपास संथगतीने होत असतो. यावर उपाय म्हणून आत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik CP Office) हद्दीत होणाऱ्या सर्वच मोटार व रस्ते अपघातांच्या प्रकरणात आता पोलीसच फिर्यादी असणार आहेत. यात प्राथमिक चौकशी पासून गुन्हा दाखल करण्यासाठी लागणारे फिर्याद पोलीस दाखल करणार आहेत. अनेक अपघातात जखमींच्या नातेवाईकांना फिर्याद फिर्यादी केले जात असल्याचे निरीक्षण पोलीस आयुक्तांनी नोंदवून तपासासह गुन्हे नोंदी बाबत आदेश दिले आहेत. 

राज्यात अपघात प्रकरणी पोलिसांतर्फे फिर्याद दिली जात असताना नाशिक शहरात मात्र ही प्रक्रिया लागू नसल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी हे आदेश काढून तात्काळ अंमलबजावणीच्या सूचना केल्या आहेत. त्यातून योग्य गुन्ह्यांच्या नोंदीसह दोषारोपसिद्धीला मूर्त स्वरूप येणार आहे. शहरात दाखल होणाऱ्या फेटल व मोटार अपघातांमध्ये जखमीच्या नातेवाईकांना फिर्यादी केले जाते, हे सुसंगत नसल्याचे नाशिक पोलीस आयुक्तांचे निरीक्षण आहे. अपघाताची प्राथमिक चौकशी प्रशिक्षित पोलीस म्हणून अंमलदार करतात किंवा अधिकारी करतात. अपघात कसा झाला, याची माहिती वाहतुकीचे नियम वाहन कायदा याची संपूर्ण माहिती सर्वसामान्यांपेक्षा पोलिसांना अधिक असते. त्यासाठी अपघाताची प्राथमिक चौकशी पोलिसातर्फे करण्यात येते. तर चौकशीची संबंध नसलेल्या व्यक्तीला फिर्यादी केल्यास दोषारोपसिद्धी दरम्यान अडचण निर्माण होते. त्यामुळे यापुढे शहरात प्रत्येक अपघाताच्या गुन्हा तपासणीसाठी पोलीस स्वतःहून फिर्याद देतील. यासंदर्भात स्पष्ट आदेश पोलीस आयुक्तांनी निर्गमित केले असून सर्व पोलीस ठाण्यांमधून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

पोलीस आयुक्तांच्या निरीक्षणात काय आलं? 

दरम्यान कोणत्याही अपघातांची चौकशी पोलिसातर्फे होते. कारण पोलिसाना वाहतुकीचे नियम, अपघाताचे कारण, स्थिती व इतर ज्ञान अधिक असते. त्या संदर्भात प्रशिक्षण दिलेले असते सर्वत्र पोलिसांनीच फिर्याद देण्याची पद्धत आहे त्यानुसार नाशिक आयुक्तालयातही त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान सामान्य फिर्यादी असल्यास अपघाता संदर्भात योग्य माहिती देईलच, असे होत नाही. शिवाय फिर्याद ही जखमी व्यक्ती नातेवाईक स्वतःच्या बाजूनेच नोंदवत असल्याचे निदर्शनास आले आहे. फिर्यादीत तथ्य अपेक्षित त्यासाठी पोलीस चौकशीचा आधार महत्त्वाचा असतो.  सर्वसामान्य फिर्यादी न्यायालयीन प्रक्रियेत पुरेसे सहकार्य करतातच असे नाही. न्यायप्रक्रिया सर्वसामान्य फिर्यादी साक्षीदार जबाब पालटण्याची शक्यता असते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रहीGadchiroli Earthquake | गडचिरोलीत सकाळदरम्यान भूकंपाचे धक्के, CCTV व्हिडिओ!Earthquake Bhandara | गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के, तेलंगणात भूकंपाचं केंद्रस्थानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Embed widget