Nashik News : 21 वर्षांनंतर कुटुंबीय आनंदात होतं...मात्र क्षणार्धात वाईट घडलं, गर्भवतीसह जुळ्या बाळांचा मृत्यू
Nashik News : नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या मोराणकर कुटुंबियांवर दुःखद घटनेने डोंगर कोसळला आहे.
Nashik News : कुटुंबात लहान मुलं येणं म्हणजे अगदी सुखद अनुभव असतो. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. मात्र अशावेळी एखादी अनुचित घटना आनंदाचे रूपांतर दुःखात करते. अशीच एक डोळ्यांत पाणी आणणारी घटना नाशिक (Nashik) शहरात घडली आहे. चक्कर येऊन पडल्याने गर्भवती महिलेचा (Pregnant Women) जुळ्या बाळांसह दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नाशिक (Nashik) शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील राहणाऱ्या मोराणकर कुटुंबियांवर या दुःखद घटनेने डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार पूजा देवेंद्र मोराणकर असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. मोराणकर कुटुंबीय हे पाथर्डी फाटा परिसरात वास्तव्यास आहेत. आज सकाळी पूजा या घरातील कामे उरकल्यानंतर त्या अंघोळीला गेल्या. अंघोळ झाल्यानंतर बाथरूममधून बाहेर येत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्या घरातच कोसळल्या. यावेळी घरात त्यांचे वडील रमेश चिंतामण पाखले आणि बहीण होती. पूजा जमिनीवर कोसळल्याचे पाहून पाखले यांनी तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र पूजा यांच्यासह त्यांच्या गर्भातील जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
नाशिकच्या पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरातील आनंदनगर येथील गजानन ऑर्केड या इमारतीमध्ये मोराणकर कुटुंबीय राहते. मोराणकर अंबड येथील एका खासगी कंपनीत नोकरीला असल्याचे समजते. अनेक वर्षानंतर पूजा यांना मातृत्वाची चाहूल लागल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होते. त्यामुळे त्यांची काळजी संपूर्ण कुटुंब घेत होते. तर वडील रमेश पाखले आणि बहीण देखील पूजा यांना भेटण्यासाठी आले होते. प्रसुतीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने नियमितपणे स्त्री रोग तज्ञांकडून त्यांची तपासणी सुरू होती. त्यात जुळ्या मुलांचा योग असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. आज अंघोळीनंतर बाहेर आल्या असता त्यांना चक्कर आल्याने त्या खाली कोसळल्या. तातडीने त्यांना पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी पूजा यांच्यासह गर्भातील जुळे देखील मृत झाल्याचे सांगितले. या घटनेने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
21 वर्षांनंतर कुटुंबीय आनंदात होतं...
कुटुंबीय हे मूळचे धुळे येथील आहेत, पूजा यांचे पती देवेंद्र जगन्नाथ मोरानकर हे नाशिकला नोकरीला असल्याने ते नाशिकला राहत होते. अशातच मोराणकर कुटुंबात तब्बल 21 वर्षांनी लहान मुलं येणार असल्याने आनंदी आनंद होता. शिवाय पूजा यांच्या प्रसुतीसाठी अवघे काही दिवस शिल्लक सल्याने दोन्ही कुटुंबीय पूजा यांची काळजी घेत होते. त्यानुसार पूजा या स्वतःची काळजी घेत होत्या, पण आज काळाने त्यांना घेरले. एका क्षणातच संपूर्ण कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. वडील आणि बहीण हे दोन्ही कालच पूजांना भेटण्यासाठी नाशिकला आले होते. वडील रमेश पाखले हे चाळीसगाव येथील रहिवासी आहेत. सध्या ते पुण्यात स्थायिक आहेत. मुलगी पूजेच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठीच ते नाशिकला आले होते आणि त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री उशिरा पूजा यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले