Viral Video : हदयस्पर्शी! 30 आठवड्यांनंतर गर्भवती पत्नीला भेटला युक्रेनी सैनिक, व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक
Russia Ukraine War : युक्रेनी सैनिक 30 आठवड्यांनंतर सुखरुप परतला. यावेळी गर्भवती पत्नीला पाहून तो भावूक झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![Viral Video : हदयस्पर्शी! 30 आठवड्यांनंतर गर्भवती पत्नीला भेटला युक्रेनी सैनिक, व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक russia ukraine war ukraine soldier pregnant wife meeting viral video Viral Video : हदयस्पर्शी! 30 आठवड्यांनंतर गर्भवती पत्नीला भेटला युक्रेनी सैनिक, व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/c2ed19c9b1877530553a942f5ac4f8f61673168366170322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ukraine Soldier Meeting Pregnant Wife : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध सुरुच आहे. 10 महिन्यांहून (Ukraine Russia War) अधिक काळ उलटला असला तरीही या दोन्ही देशांमधील संघर्ष मिटण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. युक्रेनही रशियासमोर हार मानायला तयार नसून पूर्ण शर्थीने युक्रेन रशियाला चोख प्रतुत्तर देत आहे. या युद्धामुळे युक्रेनमधील अनेक निरपराध नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत. दिवसागणीक हा आकडा वाढत आहे. जिवाची पर्वा न करता युक्रेनी सैनिक रशियन सैन्याशी दोन हात करत आहेत.
30 आठवड्यानंतर आपल्या सुखरुप परतला युक्रेनी सैनिक
या युद्धामुळे अभूतपूर्व संकट कोसळलं आहे. युद्धामुळे अनेकांनी जीव गमावला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. सैनिकांचे कुटुंबिय फार चिंतेत आहेत. कारण त्यांच्यावर कधी काळाचा घाला होईल सांगता येत नाही. अशावेळी एक सैनिक 30 आठवड्यानंतर आपल्या सुखरुप परतला असून आपल्या घरी परतला आहे. सुमारे सात महिन्यानंतर युद्धावरून सुखरुप परतलेला हा सैनिक पहिल्यांदाच त्याच्या गर्भवती पत्नीला भेटला आहे. यावेळी हे जोडपे फार भावूक झालं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गर्भवती पत्नीला पाहून युक्रेनी सैनिक भावूक
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, युद्धावरून सुखरुप परतल्यावर एकमेकांना पाहून हे जोडपे फार खूश होते. त्यानंतर ते एकमेकांना घट्ट मिठी मारतात. यावेळी फार दोघांनाही अश्रू अनावर होतात. विरहानंतरची ही भेट त्यांच्यासाठी अतिशय अविस्मरणीय क्षण ठरतो. हा व्हिडीओ Gerashchenko_en नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
This is what we're fighting for.
— Anton Gerashchenko (@Gerashchenko_en) January 3, 2023
They haven't seen each other for 30 weeks.
📹: yanina_sham/Instagram pic.twitter.com/vVrkdlRAln
व्हिडीओ पाहून डोळे भरून येतील
युक्रेनियन सैनिक आणि त्याच्या गर्भवती पत्नी यांच्या भेटीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ही व्हिडीओ 30,000 हून अधिक ट्विटर वापरकर्त्यांनी पाहिला असून अद्यापही व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. युद्धाच्या परिस्थितीत पती-पत्नीचे प्रेम आणि गर्भात वाढणाऱ्या नवा जीव हे पहून नेटकऱ्यांचेही डोळे पाणावले आहेत.
30 आठवड्यांनंतर पहिली भेट
युक्रेनमधील युद्धग्रस्त भागातील परिस्थिती इतकी बिकट आहे की, शहीद झाल्यानंतर आपल्या प्रियजनांना शेवटचे पाहण्याची संधीही कधी-कधी मिळत नाही. अशा नकारात्मक वातावरणात जेव्हा पती सुखरुप परत येतो, तेव्हा ही महिला फार खूश होते. हा युक्रेनियन सैनिकआणि त्याची गर्भवती पत्नी 30 आठवड्यांनंतर पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांच्या भावना या व्हिडीओमधून दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)