एक्स्प्लोर
Advertisement
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी नागपूर महापालिकेत 'जयंती'
नागपूर महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाऐवजी जयंती असल्याचं नमूद केलं.
नागपूर : नागपूर महापालिकेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांची 'जयंती' असल्याचा उल्लेख करत अभिवादन करण्यात आलं. विशेष म्हणजे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयातच हा कार्यक्रम पार पडला होता.
नागपूर महापालिकेकडून स्थानिक पत्रकारांना या कार्यक्रमाचं प्रसिद्धीपत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आलं होतं. यामध्ये बाळासाहेबांच्या 'जयंतीनिमित्त' त्यांना नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती अध्यक्ष विक्की कुकरेजा, शिवसेनेच्या नगरसेवकांनी अभिवादन केल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे सालही 2019 करण्यात आले आहे.
महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं, तर इतर उपस्थितांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रम पार पडल्यानंतर त्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी जे प्रसिद्धीपत्रक महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलं, त्यात चूक करत बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाऐवजी जयंती असल्याचं नमूद केल्यामुळे महापालिकेत अधिकारी किती गांभीर्याने काम करतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर महापालिकेचे प्रसिद्धीपत्रक
नागपूर महानगरपालिका, नागपूर
(जनसंपर्क विभाग)
प्रसिद्धी पत्रक ता. 17 नोव्हेंबर 2019
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
नागपूर, ता. 17 : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे, निगम सचिव हरिश दुबे, रंजना कडूकर, सुनिता कान्हारकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement