एक्स्प्लोर

'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?

इंद्रजित सावंत यांना ब्राह्मणांची ओकात दाखवून देऊ. जिथे बोलवशील तिथे येऊ, तुझ्या घरात येऊन मारेन, असे धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Kiran Mane on Udayanraje Bhosale and Shivendrasinh Bhosale : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून अनेकांनी या धमकीचा निषेध केला आहे. आहे. एका व्यक्तीने कॉल करून धमकी दिल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे. हा व्यक्ती नागपूर येथील प्रशांत कोरटकर असल्याचेही त्यांनी सांगितले. रेकॉर्डिंग सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यात धमकी देणारा व्यक्ती अर्वाच्य शिवीगाळ करत असल्याचे दिसून येते. माझे नाव गुगलवर शोध. ब्राह्मणांना हलक्यात घेऊन नको. ब्राह्मणांची ओकात दाखवून देऊ. जिथे बोलवशील तिथे येऊ, तुझ्या घरात येऊन मारेन, असे धमकी देणारी व्यक्ती म्हणत आहे. यानंतर कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला असून देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी कोल्हापूर पोलिस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत. 

आईबापांचे वाभाडे निघूनही आम्ही लाचारच राहू?  

दरम्यान, इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आल्यानंतर एक सातारकर म्हणत अभिनेते किरण माने यांनी खासदार उदनयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना थेट सवाल केला आहे. त्यांनी सोशल मीडियातून सवाल करत म्हटले आहे की, छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे... एक सातारकर तुम्हाला हक्कानं विचारतो आहे. इंद्रजीत सावंतांना आलेल्या धमकीच्या फोनमध्ये छ. शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का? की आपल्या आईबापांचे वाभाडे निघूनही आम्ही लाचारच राहू? तुम्ही म्हणाल तसं!

धमक्यांना मी भीक घालत नाही

दरम्यान, मला प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने धमकी दिली असली तरी अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा व्यक्तीवर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत, असा संदेश द्यावा, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे. सावंत यांनी सांगितले की, सोमवारी मध्यरात्री 12 वाजता मला कोरटकर नावाच्या व्यक्तीचा फोन आला. ती व्यक्ती शिव्या देत जातीवाचक बोलत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख त्याने केला असून हा महाराष्ट्र पेशव्यांचा आहे का, असा सवाल त्यांनी केला. संभाजी महाराज यांचा इतिहास मी कसा बदलू. इतिहासाचे दाखले ब्रिटिश काळापासून आहेत. खोटा व घाणेरडा इतिहास सांगावा, अशी त्यांची इच्छा आहे. पण, खोटा इतिहास आम्ही का सांगू, असेही सावंत म्हणाले. 

अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी 

दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या कुविचारी कोरटकर वर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करत अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी, असे म्हटले आहे. त्यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विषवल्ली या राज्यात राहते, हीच बाब धक्कादायक आहे. सामाजिक दरी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अशा माथेफिरू लोकांना कुणीही पाठीशी घालू नये. देशाची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या या कुविचारी कोरटकर वर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करत अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Keshav Upadhye : अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गा-मशिदी मागे का? भाजपचा सवाल
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गा-मशिदी मागे का? भाजपचा सवाल
Latur News : लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज अन् जमीन हलल्याचा भास; भयभीत नागरिक रस्त्यावर, गावकऱ्यांना 32 वर्षांपूर्वीच्या भूकंपाची आठवण
लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज अन् जमीन हलल्याचा भास; भयभीत नागरिक रस्त्यावर, अफवांनाही उधाण
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Yashwant Sardeshpande Passed Away: आधी छातीत दुखलं, रुग्णालयात नेईपर्यंत जगच सोडलं; प्रसिद्ध अभिनेता, निर्मात्यानं घेतला अखेरचा श्वास, 62व्या वर्षी निधन
आधी छातीत दुखलं, रुग्णालयात नेईपर्यंत जगच सोडलं; प्रसिद्ध अभिनेता, निर्मात्यानं घेतला अखेरचा श्वास, 62व्या वर्षी निधन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Keshav Upadhye : अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गा-मशिदी मागे का? भाजपचा सवाल
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गा-मशिदी मागे का? भाजपचा सवाल
Latur News : लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज अन् जमीन हलल्याचा भास; भयभीत नागरिक रस्त्यावर, गावकऱ्यांना 32 वर्षांपूर्वीच्या भूकंपाची आठवण
लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज अन् जमीन हलल्याचा भास; भयभीत नागरिक रस्त्यावर, अफवांनाही उधाण
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Yashwant Sardeshpande Passed Away: आधी छातीत दुखलं, रुग्णालयात नेईपर्यंत जगच सोडलं; प्रसिद्ध अभिनेता, निर्मात्यानं घेतला अखेरचा श्वास, 62व्या वर्षी निधन
आधी छातीत दुखलं, रुग्णालयात नेईपर्यंत जगच सोडलं; प्रसिद्ध अभिनेता, निर्मात्यानं घेतला अखेरचा श्वास, 62व्या वर्षी निधन
Ind Vs Pak Asia Cup: मॅच संपल्यावर आम्ही दीड तास ताटकळत, ट्रॉफी घ्यायला जाणार इतक्यात ते लोक.... सूर्यकुमार यादवने सांगितली दुबईच्या मैदानातील Inside Story
मॅच संपल्यावर आम्ही दीड तास ताटकळत, ट्रॉफी घ्यायला जाणार इतक्यात ते लोक.... सूर्यकुमार यादवने सांगितली दुबईच्या मैदानातील Inside Story
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Mainak Ghosh : एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
Embed widget