लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
अमेरिकेत शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या नीलम हीचा 14 फेब्रुवारी 2024 रोजी व्यायामासाठी चालताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झालाय

सातारा : सरकारी अधिकारी किंवा मंत्री, मंत्र्यांचे नातलग यांच्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणा जोरदारपणे कामाला लागते. मात्र, सर्वसामान्य लोकांसाठी, नागरिकांसाठी यंत्रणेपुढे सातत्याने चपला झिजवाव्या लागतात हेही तितकेच खरंय. कारण, काही दिवसापूर्वी राज्यातील एका माजी मंत्र्याच्या मुलाला थांबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करुन चक्क हवेतूनच विमान वळविण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र, मरणाच्या दारात असलेल्या मुलीला वाचविण्यासाठी, तिच्या भेटीसाठी अमेरिकत जाऊ इच्छिणाऱ्या तिच्या बापाला मेडिकल इमर्जन्सी व्हिसा (Visa) मिळत नाही. भारतातून परदेशात केवळ मौजमौज्जा करण्यासाठी मंत्र्याच्या मुलाला विमान मिळते, मिळालेले विमान हवेतून परतही फिरते. मात्र, अमेरिकेतील (America) रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या लेकीला पाहण्यासाठी बापाला मंत्र्यांच्या बंगल्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.
सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील उंब्रज गावातील नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत गेल्या 11 दिवसापूर्वी अपघात झाला असून तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मरणाच्या दारात असताना तिच्याजवळ जाण्यासाठी तिच्या पालकांना भारतातून व्हिसा मिळेना गेल्याने वडिलांनी नाराशा व्यक्त केली आहे. प्रशासना व शासनाकडे आर्जव करुन हतबल झालेल्या, दमलेल्या या बापाची कहाणी कोणी ऐकेल का, या बापाला लेकीच्या भेटीसाठी कुणी व्हिसा देईल का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे वडिल तानाजी शिंदे यांनी यासाठी अनेक मंत्र्यांच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या आहेत.
अमेरिकेत शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या नीलम हीचा 14 फेब्रुवारी 2024 रोजी व्यायामासाठी चालताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झालाय. या अपघातासाठी दोषी असलेल्या कार चालकाला पोलिसांनी पकडले आहे. मात्र, रक्तातील नातेवाईक आल्याशिवाय याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल होत नसल्याचे अमेरिकेतील पोलिस सांगत आहेत. या अपघातात नीलमच्या दोन्ही हाता, पायांना आणि डोक्याला दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने ती कोमातील स्थिती असल्याचे डाक्टर सांगत आहेत. तिची रूममेट खुशी ही महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उंब्रजमधील पालकांना याबाबत माहिती मिळत आहे. मात्र, वडिल तानाजी यांना मुलीच्या भेटीसाठी हवा असलेला इमर्जन्सी व्हिसा मिळत नाहीय.
अमेरिकेतील हॉस्पिलटलने दिलंय पत्र
तानाजी शिंदे यांनी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून व्हिसासाठी संपर्क केला. तर, मुंबईतील कुर्ला येथे पासपोर्ट व्हिसा आँफिसलाही पालकांनी भेट दिलीय पम, व्हिसासाठी त्यांना दाद मिळत नसल्याचं त्यांची म्हणणं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील हॉस्पिटलने अपघातानंतर नीमच्या पालकांना पत्र देखील दिलं आहे, ज्या आधारे ते व्हिसासाठी मागणी करत आहेत. मात्र, व्हिसा मिळत नसल्याने वडिलांच्या हतबलतेकडे आता सरकार देईल का, हाच खरा प्रश्न आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
