Pune Crime Case Swargate : 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर अत्याचार! पुण्यातील घटनेची A टू Z कहाणी
पुण्यातील स्वरगेट बस स्टँडवर एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी 5:30 वाजता घडली. पीडित तरुणी ही पुण्यात कामाला आहे आणि ती फलटणला तिच्या गावी जात होती.
घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले की, आरोपी तरुणीला बस स्टँडवर भेटला आणि तिला फलटणची बस शोधण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तो तिला बस स्टँडमधून बाहेर काढून नेला आणि तिला एका एसटी बसमध्ये बसवले.
बस अंधारात होती, त्यामुळे तरुणीने आरोपीला बसात अंधार का आहे असे विचारले. आरोपीने तिला सांगितले की ही रात्रीची लेटची बस आहे आणि लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत. त्यानंतर तो तिला बसच्या वरच्या बाजूला टॉर्चने चेक करण्यास सांगतो.
तरुणी वरच्या बाजूला गेल्यानंतर आरोपीने बसमध्ये दरवाजा लावून तिला बलात्कार केला.
घटना घडल्यानंतर तरुणी बसमधून उतरली आणि ती तिच्या गावी जात होती. तिने तिच्या मित्राला फोन करून घटना सांगितली आणि मित्राने तिला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.
तरुणीने सोमवारी रात्री 9 वाजता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. पोलीसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीची ओळख पटवली.
आरोपी हा शिरूर गावचा रहिवासी आहे आणि त्याच्यावर पूर्वी 392 कलमाखाली गुन्हे दाखल आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी बस स्टँडवरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.























