Shivaji Nagar House Collapse : मुसळधार पावसामुळे मुंबईतील दहिसरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू
दहिसरच्या शिवाजीनगर येथील लोखंडी चाळीत तीन मजली चाळीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : काल मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चाळीचा काही भाग कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ आज दहिसरच्या शिवाजीनगर येथील लोखंडी चाळीत तीन मजली चाळीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.
Mumbai | One person killed after three houses collapsed at Lokhandi Chwal, in Shivaji Nagar, Dahisar (E) #Maharashtra pic.twitter.com/ctMCzsLVme
— ANI (@ANI) June 10, 2021
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे. खबरदारी म्हणून येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
