एक्स्प्लोर

9 व 10 डिसेंबरला मुंबई महापालिकेतील S विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी दुरुस्तीसाठी 9 व 10 डिसेंबरला मुंबई महापालिकेतील S विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.के पूर्व, एच पूर्व, एल व जी उत्तरः या 4 विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

मुंबई : येत्या 9 व 10 डिसेंबरला सुमारे 4 किलोमीटर लांबीची व 1800 मिलीमीटर व्यासाची ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी बदलविण्याचे काम मुंबई महापालिकेकडून केलं जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या ‘एस’ विभाग क्षेत्रातील काही परिसरांमध्ये या दोन दिवसांत पाणीपुरवठा होणार नाही. तर याच 2 दिवशी ‘के पूर्व’, ‘एच पूर्व’, ‘एल’ व ‘जी उत्तर’ या 4 विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन आदल्या दिवशी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे जुन्या जलवाहिनीच्या जागी नवीन जलवाहिनी टाकताना ती गरजेनुरुप अधिक मोठ्या आकाराची म्हणजेच 2400 मिलीमीटर व्यासाची असणार आहे.

9 डिसेंबरला ‘एस’ विभागातील पाणीपुरवठा न होणाऱ्या परिसरांची नावे :

  • (सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत)
  • डक लाईन (खिंडीपाडा पंप क्षेत्र एस एक्स - 15) : दुपारी 2 ते सायं. 6 वाजेपर्यंत
  • राजाराम वाडी, श्रीराम पाडा (ट्रंक मेन डायरेक्ट सप्लाय एस एक्स -07) - पहाटे 5 ते सायं. 5 वाजेपर्यंत
  • खिंडीपाडा (ट्रंक मेन डायरेक्ट सप्लाय एस एक्स - 07) - पहाटे 5 ते सायं. 5 वाजेर्यंत.
  • टेंभीपाडा, सोनापूर, तुलशेतपाडा, प्रताप नगर, जमिल नगर, समर्थ नगर, सुभाष नगर, द्राक्षबाग, उत्कर्ष नगर, राजदीप नगर, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा नाहूर (पश्चिम) व भांडुप (पश्चिम) परिसर, (भांडूप पश्चिम क्षेत्र, टेंभीपाडा पोलिस चौकी एस एक्स 03) - पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत
  • जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि लगतचा परिसर, फिल्टर पाडा (फिल्टरपाडा एस एक्स- 06) – स. 10 ते दुसऱ्या दिवशी स. 10 असे 24 तास.
  • आंब्याची भरणी, रावते कंपाऊंड, राम नगर (ट्रंक मेन डायरेक्ट सप्लाय एस एक्स- 07) – स. 10 ते दुसऱ्या दिवशी स. 10 असे 24 तास. पासपोली गाव, मोरारजी नगर (मोरारजी नगर, पासपोली गाव, दरगाह एस एक्स-05) – स. 10 ते दुसऱ्या दिवशी स. 10 असे 24 तास.
  • गांवदेवी टेकडी, सर्वोदय नगर (एस एक्स-10) – दु. 1 ते दुसऱ्या दिवशी स. 9.30 वाजेपर्यंत

'के पूर्व’ विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणा-या परिसरांची नावे :

  • (दिनांक 9 डिसेंबरला सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत)
  • चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्र. 1 व 2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक परिसर, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर, (मरोळ बस बार क्षेत्र, केई - 01) दु. 2 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत तसेच उंच भागात परिणाम होईल.
  • कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत, (साहर रोड क्षेत्र, केई-01) – दु. 2 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत तसेच उंच भागात परिणाम होईल.
  • ओम नगर, क्रांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक परिसर) सहार गाव, सुतार पाखाडी (पाईपलाईन परिसर) (ओम नगर परिसर, केई - 02) - पहाटे 5 ते स. 8 पर्यंत
  • विजय नगर मरोळ परिसर, (केई - 10 ए) – सायं. 6 ते रात्री 10 पर्यंत
  • सिप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर – 24 तास या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
  • ‘एच पूर्व’ विभागात दिनांक 9 डिसेंबरला सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत. वांद्रे टर्मिनल सप्लाय झोन परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा.

‘एल’ विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणा-या परिसरांची नावे :

  • (दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत)
  • कुर्ला उत्तर परिसर, बरेली मस्जिद, 90 फुटी रस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरी-मरी, घाटकोपर अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवा औद्योगिक मार्गा लगतचा परिसर, सत्य नगर पाईपलाईन - पहाटे 5 ते दु. 2 वाजेपर्यंत तसेच उंच भागात परिणाम होईल.
  • ‘जी उत्तर’ विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणा-या परिसरांची नावे :
  • (दिनांक 9 डिसेंबरला 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत)
  • धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा (सायं. 4 ते रात्री 9 वा.) परिसर - धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग.
  • धारावी सकाळचा पाणीपुरवठा (पहाटे 4 ते दुपारी 12) परिसर - प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग या परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget