एक्स्प्लोर
कमला मिल अग्नितांडव : सर्व आरोपींचे जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले!
29 डिसेंबरच्या रात्री कमला मिल कम्पाउंड मधील वन अबव आणि मोजेस ब्रिस्टो या रेस्टोबारना लागलेल्या आगीत गुदमरून 14 जणांचा मृत्यू झाला होता.

आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मुंबई : कमला मिल कंपाऊंड अग्नीतांडव प्रकरणी सर्व 11 आरोपींचा जामीन अर्ज मुंबई विशेष सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
यात मोजोस ब्रिस्टो पबचे मालक युग टुली आणि युग पाठक, वन अबव्ह पबचे मालक जिगर संघवी, क्रिप्रेश संघवी आणि अभिजीत मानकर, कमला मिल कम्पाउंडच्या मालकांपैकी एक असलेले रमेश गोवानी, या ठिकाणचा हुक्का सप्लायर उत्कर्ष पांडे, अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील, कमला मिल कम्पाउंडचे डायरेक्टर रवी भंडारी तसच वन अबव्हचा मॅनेजर केवीन बावा आणि लोपेज या 11 जणांचा जामिन मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
कमला मिल अग्नीतांडव प्रकरणी एमआररटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना अटक करण्यात आली होती. एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर कामास मदत करणे, मृत्यूस कारणीभूत होणे अशा विविध कलमांखाली रमेश गोवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोजोस ब्रिस्टोचे संचालक युग पाठक, युग टुली, वन अबव्ह संचालक क्रिपेश संघवी, अभिजीत मानकर यांच्या विरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआरटीपी अंतर्गत पालिकेनं हा एफआयआर दाखल केला होता.
29 डिसेंबरच्या रात्री कमला मिल कम्पाउंड मधील वन अबव आणि मोजेस ब्रिस्टो या रेस्टोबारना लागलेल्या आगीत गुदमरून 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला. ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिपेश संघवी, जिगर संघवी, अभिजित मानकर, युग टुली आणि युग पाठक यांच्यावर सदोष मनुष्य वध, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, दुसऱ्याच्या जीवितास कारणीभूत, अग्नी विरोधक यंत्रणेचा वापर न करणं यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
