MHADA Lottrey : आनंदाची बातमी! मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; गोरेगावमध्ये म्हाडा आणखी 2500 घरं बांधणार
MHADA Lottery : मुंबईतील गोरेगाव, पहाडी येथे अडीच हजारांहून अधिक घरांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.
![MHADA Lottrey : आनंदाची बातमी! मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; गोरेगावमध्ये म्हाडा आणखी 2500 घरं बांधणार Good news dream of house in Mumbai will come true MHADA will build 2500 more houses in Goregaon MHADA Lottery MHADA Lottrey : आनंदाची बातमी! मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; गोरेगावमध्ये म्हाडा आणखी 2500 घरं बांधणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/28/1d3ab5b2e55e659bf5c42f7e1dfdf5ee1709111561846737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MHADA Lottery : मुंबई : मुंबईत (Mumbai News) आपल्या हक्काचं घर असावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आता तुम्हा, आम्हा सर्वांची हीच इच्छा पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून (MHADA) गोरेगावात (Goregaon) आणखी अडीच हजार घरं बांधली जाणार आहेत. पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी अडीच हजार घरं बांधण्याचा निर्णय म्हाडाच्या वतीनं घेण्यात आला आहे. त्यामुळे आता तुमच्या हक्काचं घर लवकरच पूर्ण होणार आहे.
गोरेगाव, पहाडी येथे अडीच हजारांहून अधिक घरांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवा गृहप्रकल्प हाती घेणार आहे. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर 2 हजार 500 घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरं असणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील 1 हजार 500 घरांच्या कामांसाठी निविदा काढणार : म्हाडा
म्हाडाच्या घरांची निर्मिती दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील 1 हजार 500 घरांच्या कामांसाठी निविदा काढण्याची तयारी मुंबई मंडळानं सुरू केली आहे. पत्राचाळ म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला आपल्या हिश्श्यातील 2 हाजर 700 घरं सोडतीसाठी विकासकाकडून उपलब्ध होणार होती. मात्र विकासकानं पुनर्विकास अर्धवट सोडल्यानं प्रकल्प रखडला. तर दुसरीकडे प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केला. प्रकल्प वादात अडकला आणि शेवटी राज्य सरकारनं विकासकाकडून प्रकल्प काढून घेत म्हाडाकडे सोपवला.
दरम्यान, विकासकानं म्हाडाच्या हिश्श्यातील 306 घरांचं काम सुरू केलं आहे. मात्र, ते अर्धवट सोडलं. या अर्धवट घरांसाठीच मंडळानं 2016 मध्ये सोडत काढली होती. एकूणच प्रकल्प ताब्यात आल्यानंतर मुंबई मंडळानं मूळ रहिवाशांच्या 672 घरांसह सोडतीतील घरं पूर्ण करण्याचं काम 2022 मध्ये हाती घेतलं आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. असं असताना देखील मंडळानं आपल्या हिश्श्यातील 2 हजार 500 घरांची बांधणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील 1 हजार 500 घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांतच निविदा प्रसिद्ध केली जाईल, असंही जायस्वाल यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)