एक्स्प्लोर
जमिनींचा पैसा डान्स बारमध्ये उडवला जाईल, ग्रामस्थांना भीती
काही वर्षांपूर्वी पनवेल हे लेडीज बारचे शहर म्हणून ओळखले जात होते. या छोट्याश्या शहरात 35 हून अधिक लेडीज बार असल्याने पुणे, नगर, नाशिक, नवी मुंबई अशा अनेक भागातून बारशौकीन पनवेलला येत होते. आता पुन्हा डान्स बार सुरु झाल्यास पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती होईल.

पनवेल : काही वर्षांपूर्वी पनवेल हे लेडीज बारचे शहर म्हणून ओळखले जात होते. या छोट्याश्या शहरात 35 हून अधिक लेडीज बार असल्याने पुणे, नगर, नाशिक, नवी मुंबई अशा अनेक भागातून बारशौकीन पनवेलला येत होते. डान्स बार बंद केल्यानंतर हे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले. परंतु आता पुन्हा डान्स बार सुरु झाले तर परिस्थिती जैसे थे अशी होईल, अशी भिती पनवेलमधील ग्रमास्थांनी व्यक्त केली आहे.
पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी, जेएनीटी बंदरासाठी सरकारने जमीन संपादनाचे काम सुरु केले आहे. त्यामुळे जमिनीच्या मोबदल्यात पनवेलमधील अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले आहेत. जर पनवेलमध्ये डान्स बार पुन्हा सुरु झाले तर, अनेक लोक जमिनींच्या मोबदल्यात मिळालेला पैसा बारबालांवर आणि मद्यपानावर उडवतील. असे झाल्यास येथील शेतकऱ्यांकडे ना जमीन राहील, ना त्या बदल्यात मिळालेला पैसा, अशी भिती पनवेलमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
डान्स बारमुळे पनवेल मधील स्थानिक गावकऱ्यांना त्रासाला सामोरे जाव लागत होते. आता पुन्हा एकदा डान्स बार सुरु झाल्यास पनवेलमधील ग्रामस्थांना, गावांमधील महिलांना त्रास सहन करावा लागणार आहे. आंबट शौकीन बारबाला समजून गावातील महिलांना छेडतात, असे येथील गावकऱ्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
