Manjo Jarange-Patil : झोपेत सलाईन लावलं, मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका : मनोज जरांगे
Manjo Jarange-Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manjo Jarange-Patil) मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. झोपेत सलाईन लावलं, मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका. सलाईन लावायची असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता सांगा,
Manjo Jarange-Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manjo Jarange-Patil) मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. झोपेत सलाईन लावलं, मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका. सलाईन लावायचं असेल तर अगोदर आरक्षणाची अंमलबजावणी कधी करता सांगा, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी मांडली आहे. ते अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी बोलत होते.
सरकारला धारेवर धरा; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन
जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. मी मेलो तर सरकारच्या दारात नेऊन टाका, असेही जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्याची ही चौथी वेळ आहे. त्यांनी रविवारी उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर अन्न आणि पाणीही घेण्यास त्यांनी नकार दिला होता. शिवाय वैद्यकीय उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिलाय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त पडत असलेला एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आळंदी, पुरंदर, बारामती, सोलापूर, मनमाड याठिकाणी उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला. शहरी भागात बंदला चांगला पाठिंबा मिळाला. तर ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. काही भागात बंदला प्रतिसाद मिळालेला नाही.
आमदाराच्या निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांचे उपोषण
मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील जारांगे यांनी १० तारखेपासून उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे,जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. यातच वैजापूर गंगापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या वैजापूर शहरातील निवासस्थानासमोर मराठा आंदोलक कुटुंबासह उपोषणासाठी बसले आहेत. अजय पाटील साळुंके असे उपोषणकर्त्याचे नाव आहे.
इतर महत्वाच्या बातम्या