(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 28 एप्रिल 2022 : गुरुवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. बुलढाण्याच्या सिंदखेडराजानजीक समृद्धी महामार्गावर निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला, आठवड्यातील दुसरी दुर्घटना, लोकार्पणाच्या घाईत निकृष्ट काम होत असल्याचा आरोप
लोकार्पणाच्या आधीच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पॅकेज 07 मधील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काही गर्डर कोसळले. काल (27 एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एक ट्रेलर ट्रक या मोठ्या गर्डर खाली येऊन त्याचं मोठं नुकसान झालं आहे. नशीब बलवत्तर म्हणून या ठिकाणी जीवितहानी झाली नाही.
2. 2017 सालीच भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती, दैनिक लोकसत्ताच्या कार्यक्रमात आशिष शेलारांचा गौप्यस्फोट, शिवसेनेनं साथ सोडल्याचाही पुनरुच्चार
3. राज्यात पुन्हा मास्कसक्ती करा, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची मागणी, कोरोना लसीकरण आणि टेस्टिंगवर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
4. इंधनाच्या करावरुन केंद्र आणि राज्यात जुंपली, कर कमी करण्याचं मोदींचं महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला आवाहन, उद्धव ठाकरेंचीही तिखट प्रतिक्रिया
5. राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीबाबत आज निर्णय, मनसे नेत्यांसह पोलीस आयुक्तांचीही माहिती, त्याच जागेवर सभा घेण्यावर मनसे ठाम
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. अटी आणि शर्तींसह राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी दिली जाणार असून आज दुपारी 12 वाजेपर्यंत परवानगीचा आदेश निघण्याची शक्यता आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. तसेच, पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, अशी अट घालण्यात येणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मनसेच्या सभेबाबत पोलिसांचा प्लॅन एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 28 एप्रिल 2022 : गुरुवार
6. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचं शिष्टमंडळ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार, खासदार संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यानं नाराजी
7. सोमय्यांच्या चेहऱ्यावर झालेली जखम 0.1 सेंटीमीटरची, भाभा रुग्णालयाचा अहवाल, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सोमय्यांवर टीकास्त्र
8. नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार, गृहमंत्र्यांची माहिती
9. भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अंतरिम जामिनाबाबत आज फैसला, तर नाईक डीएनए चाचणीसाठी तयार, गणेश नाईकांच्या वकिलांची माहिती
10 . आता राज्यातल्या कैद्यांनाही कर्ज मिळणार, पुण्याच्या येरवडा कारागृहातून 1 मेपासून जिव्हाळा कर्ज योजनेचा शुभारंभ, राज्य सहकारी बँकेकडून कर्जपुरवठा होणार