Sowing Update: जमिनीमध्ये 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई नको; तज्ञांचं मत
राज्यात पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरी राज्यात अनेक भागात पाऊसाने दांडी मारली आहे. जमिनीमध्ये 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई नको, असं मत हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलं.
![Sowing Update: जमिनीमध्ये 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई नको; तज्ञांचं मत Sowing Update: sowing till the soil gets moisture up to 65 mm Sowing Update: जमिनीमध्ये 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई नको; तज्ञांचं मत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/13/1ada5433d1f20d1932fcd602015243a7_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sowing Update: जमिनीमध्ये 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई नको. राज्यात पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरी राज्यात अनेक भागात पाऊसाने दांडी मारली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. तर पावसाने दांडी मारलेल्या भागात पेरण्या संकटात आल्या आहेत.अश्यातच राज्यात पाऊसाचा प्रमाण हा 15 जुलै पर्यंत असाच असणार असून राज्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असं मत हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलं.
मार्च,एप्रिल,मे महिन्यात वाऱ्याचा जो वेग नोंदवला गेला आहे. तो वेग दीड दोन किलोमीटर असा नोंदवला गेला आहे. जेव्हा अस वाऱ्याचा वेग असतो. तेव्हा पाऊसाला रस्ता नीट मिळत नाही.हवेचे दाब जर जास्त असेल तर तेव्हा वाऱ्याचा वेग कमी होतो.आणि जून महिन्यात जो पाऊसाचा खंड निर्माण झाला आहे. त्याला हेच मुख्य कारण असल्याचं यावेळी साबळे यांनी सांगितलं.
राज्यात आत्तापर्यंत केवळ 13 टक्के क्षेत्रावरच पेरणी
राज्यातील शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहे. पावसान दडी मारल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही. काही ठिकाणी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, राज्यात अद्याप 87 टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे. राज्यात केवळ 13 टक्के क्षेत्रावरच खरीपाची पेरणी झाली आहे. पेरणीची स्थिती सध्या असमाधानकारक आहे. मागील वर्षी या काळात राज्यातील पेरणी 100 टक्के पूर्ण झाली होती. त्यामुळं यावेळी शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत खरीपाच्या पेरणीच्या संदर्भातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत केवळ 134 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी याचवेळेत 270 मिलिमीटर पाऊस पडला होता. गेल्या वर्षी राज्यातील खरिपाच्या पेरण्या याच तारखेला पूर्ण झाल्या होत्या. राज्यात आत्तापर्यंत केवळ 13 टक्केच म्हणजे 20.30 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अद्याप 87 टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे. पेरणी करण्यासाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)